संजय राऊतांचं मुंबईत शक्ती प्रदर्शन, भाजपवर हल्लाबोल करत म्हणाले…
मुंबई | शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांची संपत्ती ईडीने (ED) जप्त केली आहे. संजय राऊत यांची संपत्ती जप्त केल्याने राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यातच संजय राऊत दिल्लीहून परतल्यानंतर ढोलताशांच्या गजरात शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केलं आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
भाजपच्या(BJP) पावलानंतर आमचीही पावलं पडतील. पुढचे 25 वर्षे भाजपची सत्ता येणार नाही. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया म्हणजे पाठीत खंजीर खुपसणं होय, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. आयएनएस विक्रांतचा घोटाळा भाजपच्या लोकांकडून झाला आहे. राष्ट्रभक्तीच्या नावावर किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यात किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इथे हजारोंच्या संख्येने शिवसैनिक जमलेले आहेत. या शक्तीप्रदर्शनात हे शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या(CM Uddhav Thackeray) समर्थनार्थ जमलेले आहेत, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आमच्यावर जे हल्ले सुरू आहेत, भाजपने स्वत:च स्वत:ची कबर खोदून घेतली आहे. तुमची कबर तुम्हीचं खोदली आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. मला वाटतं ही सुरूवात आहे. यापुढे भाजपची जशी पावले पडतील तशी आमचीही पडतील, असा इशारा संजय राऊतांनी दिला.
थोडक्यात बातम्या-
“पुढची 25 वर्षे महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार नाही”
रोहित पवारांचा संजय राऊत यांना सल्ला, म्हणाले…
“शिवसैनिकांचे डोके ठिकाणावर आहे का?, जर बाळासाहेब ठाकरे असते तर…”
‘चंद्रकांत दादा परत या, आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही’, कोथरूडमध्ये पुणेकरांची खास टोमणेबाजी
पदावरुन हटवल्यानंतर वसंत मोरेंचं पहिलं ट्विट, म्हणाले…
Comments are closed.