बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बाळासाहेबांची शिकवण आणि पवार साहेबांची सोबत, इकडची दुनिया तिकडे करू”

पुणे | शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) त्यांच्या वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत आले आहेत. यावेळीही लांडेवाडी येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना संजय राऊत यांनी तुफान फटकेबाजी केली आहे.

मी क्रिकेट खेळत नसलो तरी मला त्यातलं ज्ञान आहे. मला सगळ्या गुगल्या टाकता येतात. कारण मला बाळासाहेबांची शिकवण आहे आणि पवार साहेब सोबतीला आहेत. मला दोन गुरू आहेत त्यामुळे मैदानात बघा, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

माझा आत्मविश्वास तुम्हाला माहितीच आहे. इकडची दुनिया तिकडे करू. हे दार नाही तर ते दार. ते दार नाही तर पलिकडचं दार. आपण कुठेही जाऊ पण शिवाजी आढळराव पाटील संसदेत जाणारच, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असल्याने मला काही पथ्य, बंधनं पाळावी लागतायेत जी माझ्या तत्वात बसत नाहीत. नाहीतर हा राऊत गप्प बसला असता का? असं देखील संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“उद्धव ठाकरे तुम्ही सुखाने नांदा, पण होऊ देऊ नका तुमचा वांदा”

नवनीत राणांच्या भेटीनंतर चित्रा वाघ संतापल्या, म्हणाल्या…

प्राजक्ता माळीचा बोल्ड अंदाज, बिनाब्लाऊजच्या साडीत बघून नेटकरी संतापले

राणा दांपत्यावरील ‘ती’ कारवाई ठाकरे सरकारच्या अंगलट, न्यायालयाने सरकारला फटकारलं

झोया शेख ठरल्या ‘Mrs. Maharashtra’ किताबाच्या मानकरी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More