बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बघून घेऊ’, अनिल देशमुखांवरच्या कारवाईवर संजय राऊतांचं रोखठोक उत्तर

मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी म्हणजे नागपूरमध्ये ईडीने छापे टाकले होते. त्यासोबतच त्यांच्या वरळीच्या निवासस्थानावरही छापेमारी सुरू होती. आता याच प्रकरणात ईडीने आक्रमक कारवाईने केल्यानं अनिल देशमुख यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक उत्तर दिलं आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन विनाकारण त्रास देण्याचं हे काही नवं प्रकरण नाही. काल शरद पवार देखील याबाबत बोलले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार असोत किंवा मग शिवसेनेचे सर्वांना विनाकारण त्रास दिला जात आहे. पण महाविकास आघाडी भक्कम आहे. आम्ही बघून घेऊ, असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.

सक्तवसुली संचलनालयानं अनिल देशमुख यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले असून आज ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ईडीच्या समन्सनुसार अनिल देशमुख आज ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत. त्याआधी संजीव पालंडे आणि कुंदन शिंदे या दोघांना ईडीने अटक केली आहे. पीएमएलए कायद्यांतर्गत ही करावाई करण्यात आली आहे.

दरम्यान, देशात भाजपला पर्याय देणारी भक्कम आघाडी निर्माण करायची असेल तर काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय कोणतीही आघाडी पूर्ण होऊ शकत नाही, असं विधान मी याआधीही केलं होतं. शरद पवार यांनीही आता तीच भावना व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्ष देशातील मोठा पक्ष आहे. भाजपाला आव्हान निर्माण करायचं असेल तर काँग्रेसला सोबत घेऊनच आघाडी तयार होऊ शकेल, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

कोरोना लस न घेणं पडू शकतं महागात; धक्कादायक माहिती आली समोर

“अरे भाई हिप्पोक्रसी की भी सीमा होती है !!”

कोण राजे?, मी तर त्यांना राजे ही उपाधीही देत नाही- नारायण राणे

मोठी बातमी! अनिल देशमुखांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स

विमानतळ नामकरण आंदोलन भोवलं; नियमांचं उल्लंघन केल्यामुळे 20 हजार आंदोलकांवर गुन्हे दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More