बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दुनिया में चु*** कमी नही”, व्हिडीओ शेअर करत संजय राऊत म्हणतात…

नवी दिल्ली | देशाच्या लोकशाहीचं मंदिर असणारी संसद (Parliamant) सध्या गाजत आहे. संसदीय अधिवेशन चालू असताना गोंधळ केल्यामुळे विरोधी पक्षांच्या 12 खासदारांना (MP) निलंबित करण्यात आल्यानंतर मोठा गोंधळ उडाला आहे. निलंबित खासदारांची भेट घेण्यासाठी राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) गेले होते. या भेटीनंतर राज्यात बराच गोंधळ उडाला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत आपल्या बेबाक अंदाजासाठी ओळखले जातात. शरद पवार यांना खुर्ची दिल्यामुळं त्यांच्यावर भाजपकडून जोरदार टीका करण्यात येत होती. परिणामी या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी भाजप नेते आणि ट्रोलर्सना चु** हा शब्द वापरत त्यांच्यावर टीका केली होती. परिणामी सर्वस्तरातून संजय राऊत यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती.

संजय राऊत यांनी त्यांच्या या शब्दावर स्पष्टीकरण दिलं आहे. मी कोणताही असंसदीय शब्द वापरला नाही. तो शब्द योग्य होता. काय तक्रार करायची ती करा, या शब्दात राऊत यांनी भाजपला फटकारलं आहे. माझ्याकडं शब्दांचं भांडार आहे आणि मला ते बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मिळालं आहे. मी वापरलेल्या शब्दाचा अर्थ अनेक ठिकाणी शतमुर्ख, पढमुर्ख, मुर्ख  असा आहे, असंही राऊत म्हणाले आहेत. त्याचबरोबर त्यांनी ट्विट करत एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्राची संस्कृती मान राखणारी आहे. शरद पवार यांच्याजागी अडवाणी, अटलजी वा इतर कोणीही असतं तर मी त्यांना पण खुर्ची दिली असती असं संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत यांच्या खुर्ची प्रकरणावरून राज्यात वाद निर्माण झाला आहे.

पाहा व्हिडीओ-


थोडक्यात बातम्या 

CDS जनरल बिपीन रावत यांच्या अपघाताचं नेमकं कारण येणार समोर?

“अतिशय सुरक्षित असलेल्या चॉपरचा अपघात कसा झाला?, याची चौकशी केली जावी”

लसीच्या डोसची ऑर्डर मिळत नसल्यानं अदर पुनावांलांनी घेतला म्हत्त्वाच्या निर्णय!

सोनं-चांदी दरात घसरण; वाचा आजचे ताजे दर

‘अपघात नेमका कसा घडला?’, राजनाथ सिंगांनी लोकसभेत संपूर्ण घटनाक्रम सांगितला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More