बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पाकिस्तानात दाऊद इब्राहिम बसलाय आणि तो महाराष्ट्रातील…”, राऊतांचा जोरदार पलटवार

मुंबई | राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार वाद रंगला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या सातत्यानं ठाकरे सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. सोमय्यांनी ठाकरे सरकारचा आणखीन एक घोटाळा उघड करणार असा म्हणल्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमय्यांवर निशाणा साधला आहे.

पाकिस्तानात दाऊद इब्राहिम बसलाय आणि तो भारतातील घोटाळे उघडे करायला लागला तर त्याच्यावर कोण विश्वास ठेवेल. तो गुन्हेगार आहे, असं राऊत म्हणाले आहेत. दाऊदनं जसं दहशतवादावर बोलू नये तसं आएनएस विक्रांतसारख्या राष्ट्रीय प्रश्वावर घोटाळा करणाऱ्यांनी देखील बोलू नये, असं राऊत म्हणाले आहेत.

जे लोकभावनेशी खेळले आहेत, जे दिलासा घोटाळ्यातून मुक्त झाले आहेत अशांनी दुसऱ्यांच्यासंदर्भात असे खोटे आरोप करणं बरोबर नाही, लोक विश्वास ठेवणार नाहीत, असा टोला राऊतांनी सोमय्यांना लगावला आहे. आधी तुम्ही हिशोब द्या विक्रांतचा पैसा गेला कुठे, असा सवालही राऊतांनी सोमय्यांना केला आहे.

दरम्यान, आयएनएस विक्रांत प्रकरणी न्यायालयानं सोमय्यांना अटकेपासून संरक्षण दिलं आहे. परिणामी राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुगलबंदी रंगली आहे.

थोडक्यात बातम्या

… अन् ‘या’ कारणामुळे रणबीर-आलियाने लग्नात सात नाही तर चारच फेरे घेतले

“गृहमंत्रीपदाचा हिसका दाखवा, 2-4 भाजप नेत्यांना तुरूंगात पाठवा”

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; हवामान विभागाने दिला ‘हा’ इशारा

संजय राऊतांचा किरीट सोमय्यांना थेट इशारा, म्हणाले…

“असे हे किरीट सोमय्या महाविकास आघाडीतील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More