“आमच्याशी पंगा घेऊ नका, खूप महागात पडेल”; राऊत विरोधकांवर बरसले
मुंबई | राज्याची आर्थिक राजधानी मुंबई हनुमान चालीसावरून वादात सापडली आहे. राज्याच्या आणि देशाच्या अर्थकारणाला गती देणाऱ्या शहरात मोठा राडा चालू आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवि राणा (MLA Ravi Rana) यांच्या इशाऱ्यावरून राजकारण पेटलेलं आहे. अशातच शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena Leader Sanjay Raut) यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.
ज्या शिवसेनेचा जन्म हिंदूत्त्वासाठी झालाय त्या शिवसेनेला कालची पोरं हिंदूत्त्व शिकवणार का, असा सवाल राऊतांनी केला आहे. अमरावतीतील फिल्मी सी ग्रेड वाले आम्हाला हिंदूत्त्व शिकवणार का, असं म्हणत राऊतांनी राणा दाम्पत्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. परिणामी राज्यात वाद वाढण्याची शक्यता आहे.
शिवसेनेसोबत पंगा घेऊ नका खूप महागात पडेल, असा इशारा राऊतांनी विरोधकांना दिला आहे. काही लोक नागपूरला स्वत:ची जहागीरी समजतात, त्यांना सांगू इच्छितो की, नागपूरवरची आपली मक्तेदारी विसरा. आता यापुढील कोणतिही निवडणूक असो नागपूरचा इतिहास लिहीताना शिवसेनेचे नाव लिहिलं जाईल, असं राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, मुंबईत गोंधळ सुरू असताना राऊत नागपूरात सभा घेऊन विरोधकांचा समाचार घेत होते. अशातच राणा दाम्पत्याच्या इशाऱ्यानंतर मातोश्रीच्या कलानगर भागात सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
थोडक्यात बातम्या –
“मौका सभी को मिलता है”; नितेश राणेंचा ठाकरे सरकारला इशारा
आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या लेकींची कमाल; अंशू आणि राधिकानं रौप्यपदक पटकावलं
पालकांनो सावधान! लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय, तज्ज्ञांनी दिला ‘हा’ सल्ला
“बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर…”; शरद पवारांनी कान टोचले
“…अन् प्रसाद ओक यांना पाहताच एकनाथ शिंदे पाया पडले”; पाहा व्हिडीओ
Comments are closed.