बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाविकास आघाडी म्हणजे Mini UPAचा प्रयोग”

मुंबई | राज्यासह देशाच्या राजकारणात सध्या फक्त युपीए (UPA) या एकाच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद चालू आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंंत्री ममता बॅनर्जी (CM Mamta Banerajee) या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यानंतर युपीएबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena Leader Sanjay Raut) यांच्या काॅंग्रेस नेत्यांच्या (Congress Leaders) भेटीनं युपीएच्या चर्चा राजधानीत जोरात आहेत.

शिवसेेनेच्या एका धाडसी निर्णायानं महाराष्ट्रात ऐतिहासिक राजकीय घडामोड घडली होती. 2014 पासून सातत्यानं सत्तेची लगाम हाती घेतलेला भाजपचा विजयरथ महाविकास आघाडीनं रोखला होता. परिणामी सध्या महाविकास आघाडीच्या प्रयोगाची चर्चा सर्वत्र आहे. अशातच खासदार संजय राऊत यांनी युपीएबाबत एक सुचक वक्तव्य केलं आहे.

महाविकास आघाडी हा महाराष्ट्रातील प्रयोग म्हणजे मिनी युपीएचाच एक भाग असल्याचं स्पष्ट शब्दात संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत हे काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधीच्या भेटीसाठी जाणार आहेत. परिणामी शिवसेना युपीएमध्ये सहभागी होणार अशी चर्चा रंगली आहे. भाजपसोबत लढायचं असेल तर काॅंग्रेसप्रणित युपीए हा सर्वोत्तम पर्याय आहे, असंही संजय राऊत म्हणले आहेत.

दरम्यान, देशात आगामी काळात पाच मोठ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामध्ये केंद्रीय सत्तेचा मार्ग ज्या राज्यातून जातो त्या उत्तर प्रदेशचा सुद्धा समावेश आहे. परिणामी सत्ताधारी भाजप आणि विरोधक यांच्यात जोरदार मोर्चाबांधणी चालू आहे.

थोडक्यात बातम्या 

‘…तोपर्यंत निवडणुका नकोच’; राजेश टोपेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

काय सांगता! फक्त 3 मिनिटात तब्बल 900 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं

“सुप्रिया सुळे मॅडम, हा महाराष्ट्र आहे, आमच्या छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना…”

ना बँडबाजा, ना वरात! जितेंद्र आव्हाडांच्या लेकीच्या लग्नाची एकच चर्चा

सुप्रिया सुळे म्हणतात,”माझी केंद्र सरकारला नम्र विनंती आहे की…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More