बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विरोधी पक्षातील 100 खासदारांच्या बैठकीतील संजय राऊतांचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाले…

नवी दिल्ली | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्षातील नेते आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्ये सातत्याने आरोप प्रत्यारोपाच्या फैरी चालूच आहेत. अशातच आता लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपविरोधात एकवटण्यास सुरुवात केली आहे.

काँंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज विरोधी पक्षातील खासदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीस देशभरातील 14 पक्षांचे जवळपास 100 खासदार उपस्थित असल्याची माहिती समाेर आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत हे देखील यावेळी उपस्थित होते. या बैठकीतील संजय राऊत यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये संजय राऊत ‘चाय पे चर्चा’वरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावताना दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर चाय पे चर्चासाठी बोलावलं तर आवश्य जाऊ. परंतु पंतप्रधानांनी आम्हाला बोलवायला तर हवं. पंतप्रधान तर आम्हाला पाणी देखील विचारत नाहीत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

दरम्यान, कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये विरोधी पक्षातील खासदारांची ही बैठक होत आहे. या बैठकीस राहुल गांधींनी दोन्ही सदनातील खासदारांना आमंत्रित केलं आहे. मोदी सरकारला घेरण्यासाठी रणनिती आखण्याबाबत या बैठकीत चर्चा चालू असल्याचं सांगण्यात आहे.

थोडक्यात बातम्या –

मोठी बातमी! अमित शहा आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट होणार

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! संकेतस्थळावर लोड येऊ नये म्हणून 4 नव्या वेबसाईट जारी

“शिवसैनिकांनी योग्यच केलं, सत्तेत असलो तरी असले प्रकार सहन करणार नाही”

सर्वत्र उत्तर प्रदेशचाच बोलबाला, देशातील 24 बोगस विद्यापीठांपैकी 8 विद्यापीठे उत्तर प्रदेशची

‘जोधा अकबर’मधील ‘या’ अभिनेत्याचा जीव वाचवण्यासाठी कापावा लागला पाय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More