बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“संजय राऊतांनी ईडीला तब्बल 55 लाख रूपये दिले, अडसूळांनी राऊतांकडून काहीतरी शिकावं”

मुंबई | शिवसेना नेते आणि अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना 27 सप्टेंबर रोजी ईडीने ताब्यात घेतलं. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकरणात राज्यसरकाची चांगलीच चर्चा रंगली आहे. अशातच भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडत शिवसेना खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत याच्या पत्नीकडून घेतलेले 55 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी परत केलं होते, असा गौप्यस्फोट किरीट सोमय्या यांनी केला आहे.

संजय राऊत यांची निर्मीती असलेल्या ठाकरे चित्रपटाच्या उत्पनातून हे पैसे परत करण्यात आले असल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. तसेच संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ठाकरे चित्रपटाच्या सहनिर्मात्या असल्याचं देखील सोमय्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊतांकडून अडसूळांनी शिकावं, अशा खोचक शब्दात किरीट सोमय्यांनी टीका केली आहे. आनंदराव अडसूळांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर अडसूळांची तब्येत बिघडली बोती. त्यामुळे तातडीने अॅमब्यूलन्स बोलवण्यात आली. मात्र या गोष्टीमुळे चर्चेला आणखीन उधाण आलं.

थोडक्यात बातम्या-

“तुमचं आमचं स्वप्न पुर्ण करायचंय, 2024 ला राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल”

‘शेतकऱ्यांना मिळणार 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज’; हसन मुश्रीफ यांची घोषणा

पुढील 2 दिवस महत्त्वाचे! गुलाब चक्रीवादळामुळे ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

“मी खूप नशिबवान, कोरोनामुळे माझा जीव वाचला”

…तर मग कर्णधारची गरजच काय?; KKRच्या ‘त्या’ कृतीवर गौतम गंभीर भडकला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More