Top News देश राजकारण

…तर फारूख अब्दुल्ला यांनी पाकिस्तानात जाऊन कलम 370 लागू करावं- संजय राऊत

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्यावर टीका केलीये. जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 लागू करण्याच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी फारूख अब्दुल्ला यांना फटकारलंय.

संजय राऊत म्हणाले, “आता देशातील कोणतीही शक्ती काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 आणू शकणार नाही. हवं असल्यास फारूख अब्दुल्ला यांनी पाकिस्तानात जाऊन कलम 370 लागू करावं.”

राऊत पुढे म्हणाले, “काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करावं असे कोणताही राष्ट्रभक्त म्हणणार नाही. ज्यांना हे नको आहे त्यांचा पाकिस्तानशी संबंध असेल. 370 पुन्हा लागू करु अशी वक्तव्यं करणाऱ्यांची डीएनए टेस्ट केली पाहिजे.”

नॅशनल कॉन्फरन्सच्या एका मोठ्या कार्यक्रमात बोलताना फारूख अब्दुल्ला म्हणाले, “आम्हाला पाकिस्तानात जायचं असतं तर आम्ही 1947 मध्येच गेलो असतो. हा आमचा भारत आहे, परंतु हा महात्मा गांधी यांचा भारत आहे भाजपाचा नाही.”

महत्त्वाच्या बातम्या 

तज्ज्ञांच्या समितीपेक्षा सचिन सावंत यांना जास्त अक्कल आहे का?; आशिष शेलारांचा टोला

“…तर मी कोहलीला कर्णधारपदावरून काढून टाकलं असतं”

नवा रेकॉर्ड तयार करावा, बिहारच्या जनतेला पंतप्रधान मोदींचं आवाहन

…हा तर मानसिक विकलांगतेचा तमाशाच आहे; शिवसेनेची भाजपवर टीका

“मंत्रीपदासाठी भाजपमध्ये गेलेल्या मंडळींना शपथेची स्वप्न पडतायत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या