बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गोवा ड्रग्ज माफियांच्या ताब्यात अडकला आहे, तिकडे जाणं गरजेचं”

मुंबई | गोव्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत आज गोव्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. दौऱ्यावर निघण्यापूर्वी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना गोव्यातून निवडणूक लढवणार असल्याने आपण तिकडे चाललो असल्याची माहिती दिली आहे. तसेच राऊतांनी यावेळी भाजपवर देखील टीकास्त्र सोडलं आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे मी आता गोव्याच्या दौऱ्यावर निघालो आहे. शिवसेना गोव्यातून 22 जागांवर निवडणूक लढवणार आहे. आज संपूर्ण गोवा राज्य अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकलं आहे.

संपूर्ण गोव्यात आज कॅसिना आणि जुगाराचा कहर आहे. या गोष्टींना विरोध करत भाजपने सत्तेत येण्यापूर्वी गोव्यात अनेक आंदोलने केली. मात्र सत्तेत आल्यानंतर भाजपनेच या सर्व गोष्टींना पाठिंबा दिला आहे, असा घणाघात राऊत यांनी यावेळी केला आहे.

तसेच कोरोनाकाळात गोव्याची अवस्था फार वाईट झाली आहे. ड्रग्जमाफियांच्या ताब्यात गोवा अडकला आहे. भाजप फारच थापा मारत असल्यानं तिकडे जाणं गरजेचं आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे देखील तिकडे गेले होते. आम्ही जरी जिंकलो नसलो तरी देखील तिकडे आमचं संघटन आहे, असं देखील राऊतांनी यावेळी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“शेतकरी उद्धवस्त, उभी पीकं पाण्याखाली, औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा”

धक्कादायक! ठाण्यातील नर्सने कोरोनाऐवजी दिली रेबिजची लस अन् मग…

हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा, महाराष्ट्रातील ‘या’ 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट!

मरावे परी कीर्तीरूपे उरावे! ब्रेन डेड असूनही मुलाने वाचवले 7 जणांचे प्राण, आरोग्यमंत्रीही अंत्यसंस्काराला हजर

आमदार सुहास कांदेंना धमकीचा फोन, छगन भुजबळांनी उचललं हे मोठं पाऊल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More