बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ नामकरण ही लोकभावना नसून राजकीय खेळ”

मुंबई | देशातील मानाचा समजला जाणाऱ्या ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा’चं नाव बदलून ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ करण्याची घोषणा नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मोदींच्या या घोषणेनंतर देशभरातील राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनामधून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील मोदी सरकारला फटकारलं आहे.

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद पुरस्कार करण्यात आलं. मोदी सरकराची ही लोकभावना नसून राजकीय खेळ आहे. राजीव गांधींच्या बलिदानाचा अपमान न करता देखील मेजर ध्यानचंद यांचा सन्मान करता आला असता, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.

तसेच पुढे राऊत म्हणाले की, इंदिरा गांधी यांना दहशतवाद्यांनी मारलं. राजीव गांधी यांना देखील दहशतवाद्यांनीच मारलं.या दोघांच्या राजकीय विचारांशी मतभेद असू शकतात. लोकशाहीत मतभेदांना स्थान आहे. परंतू देशाच्या प्रगतीत मोठे योगदान असणाऱ्या पंतप्रधानांचे बलिदान हा चेष्टेचा विषय ठरु शकत नाही.

दरम्यान, पुरस्काराचे नाव बदलून ती लोकभावना होती, असं सांगून सरकार मोकळं झालं आहे. लोकभावना वगैरे ठीक आहे. पण सध्या राज्यकर्ते ठरवतात तीच लोकभावना आणि त्या लोकभावनेवर भजनाचे टाळ वाजवणे सुरु आहे, असा घणाघात राऊत यांनी सामनामधून केला आहे.

थोडक्यात बातम्या –

“शिवसेना उद्या UPA मध्ये गेली तरी आश्चर्य वाटणार नाही”

‘प्रतिज्ञा’ फेम अभिनेते अनुपम श्याम यांचं निधन, 63 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

टोकियो ऑलिम्पिकचा रंगारंग समारोप; वाचा सर्वाधिक पदक मिळवणारे ‘हे’ टाॅप 3 देश

‘झुकती हैै दुनिया, झुकानेवाला चाहिए’; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More