बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राऊतांच्या राज ठाकरेंना ‘मनसे’ शुभेच्छा, म्हणाले…

मुंबई |   मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. संपूर्ण देशातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील राज ठाकरे यांना ‘मनसे’ शुभेच्छा दिल्या आहेत.

वाद-वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले.. असे व्यंगचित्रकार.. रसिक मनाचे राजकारणी राज ठाकरे #RajThackeray यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. अशा आशयाची फेसबुक पोस्ट लिहित राऊतांनी राज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राज ठाकरे यांनी 14 जून रोजीचा आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने कुटुंबासोबतच साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांनी लिहिलेले पत्र ट्विटरवर शेअर केलंय.

मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या, याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

राजेश टोपेंकडून महाराष्ट्राला मोठी गूड न्यूज… वाचून तुम्हीही सुटकेचा निश्वास सोडाल!

“…तर सलून व्यवसाय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासन परवानगी देईल”

महत्वाच्या बातम्या-

गेल्या 24 तासांत कोरोनाचा धडकी भरवणारा नवा उच्चांक

‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ मोहिम हाती.. जगातील सर्वांत मोठी ट्रायल महाराष्ट्रात!

फक्त विकेंडला लॉकडाऊन… ‘या’ राज्याने घेतला मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More