Top News

भाजप आमदाराच्या पोस्टरवर एकनाथ खडसेंचा फोटो; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

जळगाव | माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता भाजपचे भुसावळचे आमदारही खडसेंच्या पावलावर पाऊल टाकण्याची चिन्हं वर्तवली जात आहेत.

आमदार संजय सावकारे यांच्या पोस्टरवर झळकलेला खडसेंचा फोटो. संजय सावकारे हे एकनाथ खडसे यांचे खंदे समर्थक मानले जातात. सावकारेंच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कुठल्याही नेत्याचा फोटो न लावता फक्त एकनाथ खडसे यांचा फोटो पोस्टरवर लावला.

भुसावळचे आमदार संजय सावकारे आणि त्यांच्या समर्थकांनी वाढदिवशीच धक्का दिला. एकनाथ खडसे यांच्यासोबत असल्याचा अप्रत्यक्ष संदेश त्यांनी सोशल मीडिया आणि जाहिरातीच्या माध्यमातून दिला आहे.

एकनाथ खडसे यांनी आपल्या हातावर घड्याळ बांधले. त्यानंतर अनेक खडसे समर्थकांनी राष्ट्रवादी प्रवेश केला, तर काहींनी पक्षांतराच्या अडचणी येऊ नये म्हणून टर्म झाल्यानंतर त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘काँग्रेसला संपवण्याचा हा एक मोठा कट आहे’; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

लोकल ट्रेनचा प्रवास सर्वसामान्यांना थेट पुढच्या वर्षीच; मुंबई महापालिका आयुक्तांचे संकेत

शेतकऱ्यांचे आंदोलन भाजपच्या अंगलट, हरियाणातील खट्टर सरकार संकटात

शरद पवार युपीएचे अध्यक्ष झाल्यास; संजय राऊतांची प्रतिक्रिया म्हणाले…

बिबट्याच्या शोधासाठी रोहित पवारांचा पुढाकार; बॅटरी आणि काठी घेऊन केली पाहणी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या