माढा राष्ट्रवादीचे उमेदवार संजय मामा शिंदेनी उडवली मोहिते पाटलांची खिल्ली

सोलापुर |  माढ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांची खिल्ली उडवली आहे. मोडीत निघालेल्या भांड्याना जसं कलई करतात तसं कलई करून मोहिते पाटलांना शरद पवारांनी सत्तेत टिकवून ठेवलं होतं, अशा शेलक्या शब्दात त्यांनी मोहिते पाटलांना लक्ष्य केलंय.

पण आता माढ्याच्या लोकांना समजलं आहे ही मोडीत निघालेली भांडी आहेत, अशी टीका शिंदेंनी मोहिते पाटलांवर केलीय.

स्वत:चे आणि पुढच्या पिढीचे स्थिरीकरण करण्यासाठी मोहिते पाटील भाजपात गेलेत, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, माढा लोकसभेसाठी भाजपने आणखी कोणत्याही उमेदवाराचं नाव घोषित केलेलं नाही.

महत्वाच्या बातम्या-

आजच्या पार्थ पवार-लक्ष्मण जगताप भेटीने मावळमध्ये उलथापालथ घडणार?

अखेर अब्दुल सत्तारांनी दिला काँग्रेसचा राजीनामा, औरंगाबाद लोकसभा अपक्ष लढवणार

अशोक चव्हाण म्हणतात, काँग्रेस पक्षात माझं कुणी ऐकत नाही!

पार्थच्या विजयासाठी पवार कुटूंबिय मावळच्या मैदानात!

शिरोळे म्हणतात, माझ्यापेक्षा जास्त मताधिक्याने बापटांना निवडून आणणार…