मोहितेंच्या भाजप प्रवेशाने संजय शिंदेंचा राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा!

पुणे | रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये जाण्याचं स्पष्ट झाल्याने आता संजय शिंदे यांना राष्ट्रवादीतून माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

माढा लोकसभा मतदारसंघ गेले काही दिवस राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथून निवडणूक लढविणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार याची चर्चा होत होती.

मोहिते- पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर या पक्षाचा उमेदवार कोण, याची उत्सुकता आहे. मिळलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे.

दरम्यान, शिंदे यांनी पवारांची भेट घेऊन आपण राष्ट्रवादीला सहकार्य करण्यास तयार असल्याचं दाखवून दिले होते. 

महत्वाच्या बातम्या-

-आमदार मुरकुटेंच्या धमक्यांना मी भीक घालत नाही- शंकरराव गडाख

-नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यापासून भारत मुक्त झाला पाहिजे- राज ठाकरे

-अजय देवगण स्काॅर्डन लीडर ‘कर्णिक’ च्या भूमिकेत

-‘धनुदादा’ ही हाक आता ऐकायला मिळत नाही, धनंजय मुंडेंचे भावूक वक्तव्य

-डाॅ. अमोल कोल्हे यांना दिलासा, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका सुरूच राहणार