“शरद पवारांना शिवसेना संपवायचीये”, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा

Sanjay Shirsat | गेल्या काही महिन्यांआधी लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षात उभी फूट पडली. दोन्ही पक्ष आणि गट एकमेकांविरोधात लढले आहेत. यामुळे आता राज्याच्या लोकसभा निवडणुकीत मतदार संभ्रमात पडल्याचं पाहायला मिळालं होतं. शिवसेनेनं शरद पवार यांच्यासोबत युती केली होती. त्यांना शिवसेना संपवायची आहे त्यासाठीच ते एव्हडे ऑक्टिव्हमध्ये असल्याचा धक्कादायक दावा हा संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला. शिवसेना आणि राष्ट्रवादी ही युती संजय राऊत यांच्यामुळे झाली असल्याचं संजय शिरसाट म्हणाले आहेत.

शरद पवार यांनी गुगली टाकल्याने…

शरद पवार यांनी गुगली टाकल्य़ाने ठाकरे गटाची अशी परिस्थिती पाहायला मिळत असल्याचं अमित शहा म्हणाले होते. असं  संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी सांगितलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी महायुतीबाबत बोलत असताना महत्त्वाचं विधान केलं आहे.

आमच्याकडे असलेल्या जागा आणि अजितदादांकडे असलेल्या जागा या यंदाच्या विधानसभेत सन्मानजनकच असतील. त्यानंतर गजानन किर्तीकर यांच्या वक्तव्याने शिवसैनिक नाराज असल्याचं वक्तव्य संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केलं आहे. भाजप आणि शिवसेना युती मजबूत आहे. मुख्यमंत्री कुठेही बदलले जाणार नाहीत.

24/7 काम करणारा हा मुख्यमंत्री आहे. मराठा आंदोलन असो किंवा ओबीसी आंदोलन असो ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या समर्थपणे सांभाळली, असं संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले आहेत.

पुण्यातील अपघातावर संजय शिरसाट यांचं भाष्य

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील कल्याणीनगर येथे पोर्शे कारने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना उडवले. यामुळे तरूण-तरूणीचा मृत्यु झाल्याने वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर आता संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुणे हीट अँड रन प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांवर देखील याप्रकरणाचा दबाव असल्याचं बोललं जात आहे.

पल्लवी सापळे यांच्यात आरोप असतील त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. पण ती व्यक्ती जर सक्षम असेल तर त्यांची चौकशी करण्यासाठी नियुक्ती केली जाईल. आरोप करणं आणि तो सिद्ध होणं यात फरक असल्याचं संजय शिरसाट पुणे येथे झालेल्या अपघात प्रकरणावर म्हणाले आहेत.

News Title – Sanjay Shirsat Big Statement About Shivsena And Sharad Pawar

महत्त्वाच्या बातम्या

“ससूनभोवती दाटलेले संशयाचे धुके…”, सुप्रिया सुळेंची सरकारकडे थेट मागणी

“गाडीवरून पाय पुरतात का तुमचे?”; ऊंचीवरून डवचणाऱ्या नेटकऱ्याला दत्तू मोरेचं रंजक प्रत्युत्तर

RBI कडून ‘या’ दोन बँकांवर मोठी कारवाई; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

ब्रह्मपुरीत पारा 47 अंशांच्या पार; ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा हायअलर्ट

“छगन भुजबळांना आवरा, वयाचा आदर करतो, पण उठसूट काहीही..”; ‘या’ नेत्याचा थेट इशारा