एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?; ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

Eknath Shinde | महायुतीकडून सत्ता स्थापनेसाठी लगबग सुरू असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. 28 नोव्हेंबररोजी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, एकनाथ शिंदे, अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांची एकत्र बैठक झाली होती. या बैठकीत मुख्यमंत्रीपदासह मंत्रीपदाबाबतही चर्चा झाली. यानंतर काल 29 नोव्हेंबररोजी पुन्हा एकदा मुंबईत महायुतीची बैठक होणार होती. पण, ही बैठक टाळून शिवसेना नेते व काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दोन दिवसांच्या मुक्कामासाठी साताऱ्यातील आपल्या दरे गावी पोहोचले आहेत. (Eknath Shinde)

नेहमी गावी आल्यावर पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधणारे शिंदे यावेळी शांत दिसून आले. त्यांनी कोणताच संवाद न साधल्याने त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. यासंदर्भात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. शिरसाट यांनी सूचक विधान करत एका वेगळ्याच चर्चेला मार्ग करून दिलाय.

संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया चर्चेत-

“राजकीय पेचप्रसंग आला, विचारासाठी वेळ हवा असेल तर ते त्यांच्या गावाला प्राधान्य देतात. ते दरे गावात जातात, तिथे त्यांचा फोन वगैरे लागत नाही.” असं संजय शिरसाट म्हणाले आहेत. ते मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी मीडिया प्रतिनिधींनी त्यांना एकनाथ शिंदे यांच्या गावी जाण्याबद्दल प्रश्न केला होता. त्यावर प्रतिक्रिया देत असतानाच शिरसाट यांनी ही माहिती दिली.

“आरामात, विचार करून मोठा निर्णय घ्यायचा असेल तर ते दरे गावात जातात. आज सायंकाळपर्यंत ते मोठा निर्णय नक्कीच घेतील. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या हालचालींबाबत ते नक्कीच मोठा निर्णय घेतील”, असं सूचक विधान संजय शिरसाट यांनी केलं आहे. त्यांचं हे वक्तव्य आता चर्चेत आलंय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आता काय नवीन निर्णय घेणार, याबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत.

दिल्लीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

दरम्यान, दिल्लीतील बैठकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अमित शाह (Amit Shah) यांच्यासमोर अनेक प्रस्ताव ठेवले असून त्यावर भाजपाने त्यांना दोन पर्याय दिल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रातील मोठं पद असे दोन पर्याय भाजपाने दिल्याची माहिती आहे. शिंदे यांनी या प्रस्तावाला होकार दिल्यानंतरच सत्ता स्थापनेच्या हालचाली होणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे. त्यातच एकनाथ शिंदे अचानक आपल्या गावी पोहोचल्याने त्यामागील कारण काय असेल, याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.

दुसरीकडे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागणार, याबाबतही जोरदार चर्चा आहेत. तर, अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदासह अर्थ खातं देण्यावर एकमत झाल्याचं समजतंय.त्याचबरोबर केंद्रात राष्ट्रवादीलाही कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, अशी माहिती आहे.

News Title :  Sanjay Shirsat big statement on Eknath Shinde

महत्वाच्या बातम्या –

सत्तास्थापनेचा मुहूर्त ठरला, मुख्यमंत्र्यांसह ‘या’ 20 जणांचा होणार शपथविधी?

आज शनिदेव ‘या’ राशींवर ठेवणार कृपाछत्र!

“बीचवर 70 लोकांसमोर…”, ‘या’ अभिनेत्रीच्या खुलाशाने बाॅलिवूड हादरलं!

बारावी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी? दीपक केसरकरांनी तारीख सांगितली