“संजय राऊत यांना पिसाळलेलं कुत्रं चावलंय”
मुंबई। शिवसेना खासदार संजय राऊत हे आज नाशिक दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी बोलत असताना त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. शिवसेना या नावाने निवडून येतात आता शिवसेना याच नावावर निवडून दाखवा, असं म्हणत राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.
संजय राऊत यांनी केलेल्या या वक्तव्यावर शिंदे गटातील आमदार संजय शिरसाठ यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. संजय राऊत यांना पिसाळलेलं कुत्रं चावलं आहे. आधी स्वतःचं घर संभाळा ना. कशाला अकलेचे तारे तोडताय? राज्यसभेच्या वेळेस हाच माणूस आमच्या पाय पडत होता. आम्ही मतदान केलेलं म्हणून हा माणूस निवडून येतो. आता हा आम्हला सांगणार काय?, असं प्रत्युत्तर त्यांनी दिलंय.
हा काय आमच्या मतदार संघात येतो का? याच्या जिवावर थोडीच आमची निवडणूक चालते का?, असं देखील संजय शिरसाठ यांनी सवाल उपस्थित करत शिरसाठ यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
संजय राऊत आमच्या जिवावर निवडून येतो असं म्हणत शिंदे गटाचे आमदार यांनी संजय राऊत यांच्यावर हलाबोल केला आहे.
थोडक्यात बातम्या-
Comments are closed.