बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खळबळजनक: उद्धव ठाकरेंना भेटण्यास शिवसेना आमदारांना सहन करावा लागायचा असा प्रकार!

मुंबई | राज्याच्या राजकारणात मोठी उलाथापालथ सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडलं आहे, त्याआधी त्यांनी भावनिक भाषण केलं, मात्र त्यावर आता शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी लिहिलेल्या पत्रानं मोठी खळबळ उडवून दिली आहे. उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी काय काय सहन करावं लागायचं याचा पाढाच आमदार संजय शिरसाट यांनी वाचला आहे.

“काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांसाठी उघडली, तेथे झालेली गर्दी पाहून आनंद झाला, ही दारं गेल्या अडीच वर्षांपासून शिवसेना आमदारांसाठी बंद होती. वर्षा बंगल्यावर प्रवेश करण्यासाठी आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या, राज्यसभेत तसेच विधानपरिषदेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करावी लागत होती”, असं संजय शिरसाट यांनी पत्रात म्हटलंय.

“मतदारसंघातील प्रश्नांसाठी फार विनवणी केल्यावर हे बडवे आम्हाला वर्षावर बोलवायचे, मात्र बंगल्याच्या गेटवरच आम्हाला तासनतास उभं ठेवलं जायचं. बडव्यांना फोन केले तर ते फोन उचलत नसत, शेवटी आम्हाला कंटाळून मागं जावं लागायचं. तीन ते चार लाख लोकांमधून निवडून येणाऱ्या आम्हाला अशी अपमानास्पद वागणूक का?,असा सवालही शिरसाट यांनी केलाय.

“आम्हाला वर्षावर प्रवेश मिळत नव्हता तेव्हा आमचे खरे विरोधक काँग्रेस, राष्ट्रवादीचे लोक तुम्हाला नियमित भेटत होते. मतदारसंघातील कामं करत होते. निधीचं पत्रं नाचवत होते. तुमच्यासोबतचे फोटो व्हायरल करत होते. लोक आम्हाला विचारायचे त्यांना भेटणारे मुख्यमंत्री तुम्हाला का भेटत नाहीत. यावर काय उत्तर द्यायचं यानं जीव कासावीस व्हायचा”, अशी खंत देखील त्यांनी बोलून दाखवलीय.

थोडक्यात बातम्या-

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वर्षा बंगला सोडायला लावणाऱ्यांना माफ करणार नाही”

“हे खरं आहे का?”, शिंदे-भाजप युतीबाबत प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या ट्विटमुळे मोठी खळबळ

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल माझ्या मनात आणखी आदर वाढला”

“आमचा विठ्ठल चांगला आहे, त्यांच्या अवतीभवती असलेल्या चारपाच बडव्यांनी त्याला घेरलंय”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More