Mahavikas Aghadi l सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र दुखावला गेला. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील माफी मागितली आहे. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजा महाराज, राजपुरुष नाहीत तर आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहेत. मी आज डोकं झुकवून माझ्या आराध्य दैवतेला चरणावर मस्तक ठेवून माफी मागत आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी जाहीर माफी मागितली आहे.
महाविकास आघाडीला महाराष्ट्रात दंगली घडवायच्यात :
मात्र या माफीनाम्यानंतर ही राजकीय माफी असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. तसेच आता या प्रकरणावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. शिवरायांचा पुतळा कोसळल्याचा निषेध करण्यासाची महाविकास आघाडी उद्या मोर्चा काढणार आहे. मात्र या मोर्चाला अद्याप पोलिसांची परवानगी मिळालेली नाही. मात्र यावर आता संजय शिरसाटांनी भाष्य केलं आहे.
महाविकास आघाडी हा पक्ष कोणताही विषय गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या आहेत. तसेच जाती- जातीमध्ये देखील दंगली घडवून आणायच्या आहेत आणि हे सगळं महायुतीमुळे घडतंय असं चित्र त्यांना जनतेला दाखवायचं आहे.
Mahavikas Aghadi l मोदींचा माफीनामा हा राजकीय नव्हे :
या गोष्टीची गुप्तवार्ता पोलिसांना पोहोचली असावी म्हणूनच पोलिसांनी देखील त्यांच्या मोर्चाला परवानगी दिली नसावी. तसेच जर परवानगी घेऊन मोर्चा काढला आणि दंगल घडवण्याचा प्रयत्न केला तर सरकार शांत बसणार नाही. त्यावेळी त्यांना चोख उत्तर दिलं जाईल असं संजय शिरसाट म्हणाले आहेत.
याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली आहे. यामध्ये कुठेही नाटकीपणा नव्हता. कारण महापुरुषांची माफी मागताना लाज वाटण्याचं कसलंही कारण नाही. सर्व महापुरुषांचा आदर आपण नक्कीच केला पाहिजे. त्यामुळे त्यांनी माफी मागितली आहे. काँग्रेस पक्षाला त्यांच्या मताचं राजकारण करायचं आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडी फक्त आग लावण्याचं काम करत आहेत देखील असं शिरसाट म्हणाले आहेत.
News Title- Sanjay Shirsat on Mahavikas Aghadi
महत्त्वाच्या बातम्या –
अक्षय कुमारचे तब्बल ‘इतक्या’ अभिनेत्रींसोबत होतं अफेअर, हिने तर रंगेहातच पकडलं होतं?
महिलांनो तुमच्या सुरक्षेसाठी फोनमध्ये ‘हे’ Apps लगेच डाउनलोड करा; एका क्लिकवर मिळेल मदत
बापरे! माजी गृहराज्यमंत्र्याचा मुलगा चालवतोय हुक्का पार्लर; मिळालं मोठं घबाड
10 ग्रॅम सोन्यासाठी आता मोजा फक्त ‘इतके’ रुपये; जाणून घ्या लेटेस्ट दर
राज्यातील लेकीही होणार मालामाल; ‘या’ योजनेतून लेकींना मिळणार दणकून पैसे