‘अजित पवार लवकरच’; शिवसेना आमदाराचा खळबळजनक दावा!

छत्रपती संभाजीनगर | 1 मे रोजी मुंबईत महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेला अजित पवार नसतील, असा खळबळजनक दावा संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केलाय.

आमदार संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी हा दावा केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

एक तारखेच्या वज्रमुठ सभेत अजित पवारांची खुर्ची दिसणार नाही. अजित पवार लवकरच सरकारमध्ये सहभागी होणार आहेत, असा दावा संजय शिरसाट यांनी केलाय. 

संजय शिरसाट यांनी यावेळी बोलताना संजय राऊतांवर देखील टीका केलीये. संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांना आव्हान दिलंय. दम असेल तर संजय राऊत यांनी कर्नाटकात उद्धव ठाकरे यांच्या सभा घेऊन दाखवाव्यात, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-