काँग्रेसला मोठं खिंडार?; ‘हा’ बडा नेता भाजपत जाणार?

संभाजीनगर | काँग्रेसला (Congress) लवकरच मोठा धक्का बसणार असल्याचं कळतंय. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला आहे.

येत्या लोकसभा निवडणुकीच्याआधी अशोक चव्हाण भाजपत जाणार आहेत, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहे. ते संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

काँग्रेसमध्ये एक वाक्यता नाही. अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांचं जमत नाही. बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांचं जमत नाही. हे तुम्ही पाहत आहात. मला तरी असं वाटतंय की अनेक दिवसांच्या ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यानुसार अशोक चव्हाण हे लोकसभेपूर्वी भाजपमध्ये जातील असं माझं मत आहे, असं संजय शिरसाट म्हणालेत.

अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाण्याची मानसिकता तयार केली आहे, असा दावाही संजय शिरसाट यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-