“संजय राऊतांनी अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवावी”

मुंबई | शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. येत्या काळात शिवसेना (Shivsena) जम्मू काश्मीरमधून निवडणूक लढवेल, येथील काश्मीरी पंडितांच्या समस्या सोडवेल, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं. आता यावरून संजय शिरसाट यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे.

संजय शिरसाट मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. तसेच राऊतांच्या वक्चव्याचाही जोरदार समाचार घेतला आहे.

संजय राऊत म्हणतात की जम्मूमध्ये निवडणूक लढवणार. पण देशात सगळीकडे तर डिपॉझिट जप्त झालंय. आम्ही त्यांना सांगणार की अमेरीकेच्या राष्ट्रपती पदाची निवडणुकही त्यांनी लढवावी, असं म्हणत संजय शिरसाट यांनी राऊतांची खिल्ली उडवली आहे.

ठाकरे गटाने आयोगाकडे सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये चुका आहेत. त्यामुळे हे धनुष्यबाण आमचंच होणार आहे. आमची ताकद वाढणार आहे हे ठाकरेंच्या लक्षात आलंय, असंही शिरसाट म्हणालेत.

राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. आता सेना भवनात राहुल गांधींना मिठी मारल्याचा फोटो लावतील, असा खोचक टोला देखील त्यांनी संजय राऊतांना लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-