Sanjay Shirsat | राज्याच्या राजकारणाचा गेल्या दोन वर्षांपासून चिखल झाल्याचं दिसत आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत 40 आमदार घेत भाजपसोबत घरोबा केला. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकटेच पडल्याचं चित्र दिसून आलं आहे. त्यावेळी महाविकास आघाडीचे राज्यातील सरकार पडलं आणि शिंदे सरकार सत्तेत आलं.
दरम्यान शिवसेनेनं शरद पवार आणि राहुल गांधींसोबत युती करू नये असा सूर जून्या शिवसैनिकांचा होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जात महाविकास आघाडीचं सरकार बनवलं. हे शिंदेंसोबत गेलेल्या शिवसैनिकांना पटलं नसल्याचं संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले आहेत.
तसेच अनेकांना दोन्ही शिवसेना ही एकत्र यावी असं वाटतं, असे अनेकदा मुंबईमध्ये बॅनर्स देखील झळकले होते. याबाबतीत आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठा दावा केला आहे. ते नेहमी दावे करत असतात. मात्र आता त्यांनी दोन्ही शिवसेना हे पुन्हा एकदा एकत्र येतील, असा दावा केल्याचं दिसून आलं आहे.
“…तर दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकतात”
“शिवसेनेची खरी दौलत ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. मात्र काहींनी निष्ठा बदलली आहे. त्यांना आता शिवसेना प्रमुखांपेक्षा शरद पवार, राहुल गांधी दौलत वाटत आहे. त्यांच्या आणि आमच्या विचारसणीमध्ये खूप फरक आहे. त्याचा आम्हाला त्रास होतो. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो असल्याचं संजय शिरसाट म्हणाले आहेत. आता जरी त्यांनी दिशा बदलल्यास दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकतात,” असं संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले आहेत.
श्रीरंग बारणेंची नाराजी
संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केलेल्या मोठ्या दाव्यानंतर आता शिवसेना आणि भाजपमध्ये धुसफूस असल्याचं बोललं जात आहे. कारण शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला आहे. तरीही इतर पक्षातील नेत्यांना कॅबिनेट पद दिलं गेलं. ते कॅबिनेट पद हे शिवसेनेच्या खासदारांना देणं अपेक्षित असल्याची मनातील सल आता मावळचे खासदार श्रीरंग बारणेंनी बोलून दाखवली आहे. एनडीएतून एक-एक निवडून आले आहेत. त्यांना कॅबिनेटमंत्रीपद दिलं गेलं. मग शिंदेगटाबाबत भाजप का दुजाभाव करत आहे?, असा सवाल श्रीरंग बारणे यांनी केला आहे.
News Title – Sanjay Shirsat Big Statement About Thackeray And Shinde Will Unite Shivsena
महत्त्वाच्या बातम्या
काल शपथ घेतली, आज खासदार म्हणतोय ‘मला मंत्री व्हायचं नाही’
बॉलिवूडमध्ये खळबळ! ‘या’ अभिनेत्रीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला
मोदींनी पंतप्रधानपदाचा स्विकार करताच शेतकऱ्यांसाठी उचललं मोठं पाऊल!
मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिला थेट इशारा!
पावसाळ्यात ट्रेकिंगला जाण्याचा विचार करताय? मग ‘या’ गडकिल्ल्यांना नक्की भेट द्या