मुंबई | एकनाथ शिंदेसोबत (Eknath Shinde) शिवसेनेचे 40 आमदार फुटल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. शिंदे गटाने भाजपच्या (BJP) पाठिंब्याने महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) पाडलं व राज्यात शिंदे सरकार स्थापन झालं.
शिवसेनेच्या (Shivsena) स्थापनेनंतर ही सर्वात मोठी बंडखोरी शिवसनेत पाहायला मिळाली. शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दर्शवल्यानंतर उद्धव ठाकरेंऐवजी खासदार संजय राऊतांविरोधात (Sanjay Raut) नाराजीचा सूर आवळला. सत्तापालट होऊन दिवस उलटले असले तरी बंडखोर आमदार अद्यापही राऊतांवर टीका करत आहेत.
शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी संजय राऊतांना फैलावर घेतलं आहे. संजय राऊतांना आधी हटवा, घर जाळायला हेच जबाबदार आहेत, असा घणाघात शिरसाट यांनी केला आहे. तसेच संजय राऊतांची निष्ठा किती हे मिलींद नार्वेकर व दिवाकर रावते यांना विचारा, अशी बोचरी टीका देखील शिरसाट यांनी केली आहे.
दरम्यान, शिंदे गटाने बंडखोरी करत गुवाहाटीला तळ ठोकल्यानंतर संजय राऊतांनी प्रेत, डुकरं यासारखे शब्द वापरत बंडखोर आमदारांवर आक्रमकपणे टीका केली होती. त्यामुळे मुंबईत परतल्यानंतर शिंदे गटाने आता संजय राऊतांना फैलावर घ्यायला सुरूवात केली आहे.
थोडक्यात बातम्या-
‘…तर उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री करण्याची वेळ राज्यपालांवर येईल’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू
“ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचं हे कुठून शिकलात?”
“केसरकर लायकी पेक्षा जास्त बोलू नका, तुमची लायकी काय हे आम्हाला माहिती”
बॉयफ्रेंडसाठी तरूणींमध्ये भररस्त्यात तुंबळ हाणामारी; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
Comments are closed.