एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होणार?; ‘या’ बड्या नेत्याने सस्पेन्स संपवला

Sanjay Shirsath | अखेर महाराष्ट्राला आज (05 डिसेंबर) रोजी नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईच्या आझाद मैदानात मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी संपन्न होणार आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार का असा प्रश्न उपस्थित होत असताना, शिंदे गटाच्या बड्या नेत्याने याबद्दलचा सस्पेन्स संपवला आहे. 

शिंदे सरकारमध्ये सहभागी होणार?

गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या दरम्यान, महायुतीच्या नेत्यांनी (04 डिसेंबर) रोजी राजभवनात जावून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. यानंतर तीनही नेत्यांनी पत्रकार परिषद घेत काही गोष्टींचा सस्पेन्स दूर केला आहे. दरम्यान, काल रात्रीपर्यंत (04 डिसेंबर) शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही? या बद्दल स्पष्टता नव्हती.

शिंदेंनी काय निर्णय घेतला?

मात्र, आता शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsath) यांनी सस्पेन्स संपवला आहे. एकनाथ शिंदे हे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार आहेत. ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली. यावेळी बोलत असताना शिरसाट म्हणाले की, तिघं नेत्यांचं एकत्रित काही ठरलं दुपारी 1 वाजेपर्यंत एखादा निर्णय आला तर काही मंत्री शपथ घेतील.

आताच्या घडीला एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील हे नक्की आहे. निरोपावर शिरसाट (Sanjay Shirsath) म्हणाले की, कोणालाही फोन आलेला नाही. शिवसेनाच नाही, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही आमदाराला वरिष्ठ नेत्यांचा फोन गेलेला नाही. म्हणून हालचाली सुरु आहेत, बोलणी सुरु आहेत.

News Title : sanjay shirsath reveals the plans about dcm eknath shinde

महत्त्वाच्या बातम्या-

शपथविधीपूर्वी फडणवीसांचा शरद पवारांना फोन, चर्चेला उधाण

‘या’ तारखेला होणार 33 मंत्र्याचा शपथविधी, कोणाला किती मंत्रिपदं मिळणार?

मोठी बातमी! गृहखात्याच्या बदल्यात शिवसेनेला ‘हे’ महत्त्वाचं खातं मिळणार

‘मैं समंदर हूं, लौटकर आऊंगा…’, तरुण महापौर ते मुख्यमंत्री; फडणवीसांचा थक्क करणारा प्रवास

एकनाथ शिंदेंचं ठरलं! मोठा निर्णय घेतला