बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजयजी, महिलांची तुलना करताना भान राखा, अन्यथा…- चित्रा वाघ

मुंबई | पालिकेच्या शाळेतील एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिक्षणाच्या मुद्द्यावरून स्मृती ईराणी यांच्यावर टीका केली होती. राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे.

संजयजी, महिलांची तुलना करताना भान राखा. अन्यथा आम्हालाही आरेला कारे करता येते, असा इशारा नेत्या चत्रा वाघ यांनी संजय राऊत यांना दिला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

जयजी काल तुम्ही स्मृती ईराणींबद्दल बरळलात. मुळात तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादकपदाचा काय संबंध आहे? ते आधी सांगा. मग मी तुम्हाला स्मृती ईराणी आणि त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा काय संबध आहे याबाबत मी नक्की खुलासा करेन, असं चित्रा वाघ म्हणाल्यात.

दरम्यान, राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उंची मोठी असल्याचं म्हटलं होतं. त्यावरही चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राणेंच्या कर्तृत्वाची उंची खूप मोठी आहे, असं कधी नव्हे ते तुम्ही खरे बोललात. राणेंच्या कर्तृत्वाची उंची वाढतच राहणार आहे. म्हणूनच तर शिवसेनेला ते झेपलं नाही, असा टोला चित्रा वाघ यांनी राऊतांना लगावला.

थोडक्यात बातम्या- 

“काढ्या आणि योगामुळे देशात कोरोनाची लाट आटोक्यात आली”

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांची प्रकृती चिंताजनक; पंतप्रधानांकडून विचारपुस

ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसलेंची ‘सदिच्छा दूत’ म्हणून निवड

“अर्थमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्यामुळे शिवसैनिक नाराज”

एकनाथ खडसेंनंतर पत्नी मंदाकिनी खडसेंना ईडीचं समन्स!

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More