पुण्याच्या संघाचे मालक म्हणतात, स्मिथ धोनीपेक्षा डोकेबाज!

Photo- BCCI

मुंबई | महेंद्रसिंग धोनी डोकेबाज खेळाडू आहे, मात्र स्टिव्ह स्मिथ त्याच्या एक पाऊल पुढं आहे, असं रायझिंग पुणे सुपरजायंट संघाचे मालक संजीव गोयंका यांनी म्हटलंय. हिंदुस्थान टाईम्ससोबत बोलताना संजीव गोयंका यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद होण्याची चिन्हं आहेत. 

दरम्यान, यापूर्वी संजीव यांचे भाऊ हर्ष गोयंका यांनी धोनीवर टीका केली होती. तेव्हा त्यांना नेटिझन्सच्या रोषाचा सामना करावा लागला होता.