‘सरन्यायाधीश’ पदाच्या दावेदाराचं नाव समोर! डी. वाय. चंद्रचूड यांनी केली शिफारस

New Chief Justice | सरन्यायाधीश डी. वाय.चंद्रचूड यांचा कार्यकाळ हा येत्या 10 नोव्हेंबरला संपणार आहे. यानंतर देशाचे नवे सरन्यायाधीश कोण होणार, याबाबत चर्चा होत्या. या संदर्भात डी. वाय.चंद्रचूड यांनी कायदा मंत्रालयाला पत्र लिहलं असून त्यांच्यानंतरचे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांची निवड करण्याची विनंती त्यात करण्यात आली आहे. (New Chief Justice )

सरन्यायाधीश चंद्रचूड निवृत्त होणार

संजीव खन्ना हे आत्ताच्या काळातले सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड ( CJI Chandrachud ) यांच्यानंतरचे वरिष्ठ न्यायमूर्ती आहेत. धनंजय चंद्रचूड 2 वर्ष त्यांच्या पदावर राहिल्यानंतर सेवानिवृत्त होणार आहेत. निवृत्तीपूर्वी त्यांनी न्या. संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केली आहे.

आता केंद्र सरकारने जर चंद्रचूड यांनी केलेली शिफारस मंजूर केली तर देशाचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांची निवड होईल. 13 नोव्हेंबर 2025 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असेल. देशाला संजीव खन्ना यांच्या रूपात नवे सरन्यायाधीश मिळण्याची शक्यता आहे. (New Chief Justice )

कोण आहेत संजीव खन्ना?

संजीव खन्ना हे वरिष्ठ न्यायमूर्ती असून 1983 मध्ये ते बार कौन्सिलचे सदस्य झाले होते. त्यांनी सुरुवातीला जिल्हा न्यायालयांमध्ये न्यायमूर्ती म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी दिल्ली येथील उच्च न्यायालयात आणि लवादांमध्ये देखील काम केलं. त्यांनी सिनियर कौन्सिल म्हणून प्राप्तीकर विभागातही काम केलं आहे. याचबरोबर त्यांनी सरकारी वकील म्हणून दिल्लीतली अनेक गुन्हेगारी प्रकरणं लढवली आहेत.

2005 मध्ये त्यांची दिल्ली उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून निवड झाली होती. 2006 मध्ये ते दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. नंतर 18 जानेवारी 2019 या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांची निवड करण्यात आली. जून 2023 ते डिसेंबर 2025 या कालावधीत संजीव खन्ना यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयाच्या कायदेशीर सेवा समितीचं कार्यकारी अध्यक्षपदही देण्यात आलं आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी 358 खंडपीठांचा भाग म्हणून काम केले असून त्यांनी 90 हून अधिक प्रकरणांचा निकाल दिला आहे. अशात, संजीव खन्ना यांची नियुक्ती सरन्यायाधीश म्हणून करण्यात यावी अशी विनंती करणारं पत्र सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी लिहिलं आहे. (New Chief Justice )

News Title : Sanjeev Khanna may become the new Chief Justice

महत्वाच्या बातम्या –

मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारचा अपघात, प्रकृतीबद्दल महत्त्वाची माहिती समोर!

‘या’ जगप्रसिद्ध गायकाचा दुर्दैवी अंत, तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

विधानसभेसाठी वंचितची तिसरी यादी जाहीर; 30 उमेदवारांच्या नावाची घोषणा

स्वामींच्या कृपेने आज ‘या’ राशींच्या मनोकामना पूर्ण होणार!

सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ लोकांची दिवाळी होणार गोड