मुंबई | अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सनातनचे वकिल संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना सीबीआयने अटक केली आहे.
पुरावे नष्ट केल्याचा आरोप संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या दोघांवर आहे.
सीबीआयने दाभोलकरांवर गोळ्या झाडणारे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हेच आहेत, असा दावा केला होता. आधीही सनातन संस्थेचा साधक विरेंद्र तावडेविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते.
दरम्यान, दाभोलकर हत्या प्रकरणातील अन्य आरोपी अमोल काळे, अमित दिग्वेकर, राजेश बंगेरा यांच्याविरोधातही दोषारोपपत्र दाखल केले जाणार असल्याची माहिती कळतीये.
महत्वाच्या बातम्या
-राज्यातील या 5 आमदारांसह एका मंत्र्याला द्यावा लागणार राजीनामा
-“हंसराज अहिर यांचा पराभव म्हणजे दारूबंदीची पहिली विकेट”
-एनडीएच्या संसदीय नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड
-मला मुख्यमंत्रीपदी राहायचं नाही- ममता बॅनर्जी
रामराजे बिनलग्नाची अवलाद; निवडून आल्यानंतर रणजितसिंहाची जहाल टीका
Comments are closed.