ठाकरेंच्या उमेदवाराची करामत!, विनेश फोगाटला निकालाआधीच दिलं सिल्व्हर मेडल

Vinesh Phogat | विनेश फोगाट (Vinesh Phogat) पॅरिस ऑलिम्पिकमधून (Paris Olympic 2024) अपात्र ठरली आणि तिच्यासह कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नांचा चुरडा झाला. फक्त 100 ग्रॅमने गोल्ड मेडलचं भारताचं स्वप्न भंगलं. निर्धारीत मर्यादेत वजन न बसल्यामुळे विनेशला फायनल सामन्यापूर्वीच अपात्र घोषित केलं गेलं.

याच प्रकरणी दाद मागण्यासाठी विनेश फोगाटनं (Vinesh Phogat) कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टमध्ये ( Court of Arbitration for Sport) अर्ज केला होता. हा अर्ज स्वीकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये त्यांनी संयुक्त रौप्य पदक देण्याची मागणी केली. मात्र याबाबत सुनावणी होऊन निकाल येणं अद्याप बाकी आहे.

संजोग वाघेरेंची करामत

संध्याकाळी 5:30 वाजता या प्रकरणी सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे. सुप्रसिद्ध वकील हरीश साळवे विनेशची बाजू मांडणार आहेत. मात्र हा निकाल येण्याआधीच ठाकरे गटाच्या नेत्याने विनेश फोगाटला निकालाआधीच सिल्व्हर मेडल मिळाल्याचं म्हटलं आहे.

निकालाआधीच ठाकरे गटातील एका नेत्याने विनेश फोगटला सिल्व्हर मेडल मिळाल्याची पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. संजोग वाघेरे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विनेश फोगटचं अभिनंदन करणारी पोस्ट शेअर केली आहे.

Vinesh Phogat ला निकालाआधीच दिलं सिल्व्हर मेडल

पोस्टमध्ये त्यांनी हारकर जितनेवाले को बाजीगर कहते हैं। विनेश फोगाटची अपील स्वीकार झाली. पॅरिस ओलंपिक संघाने सिल्वरमेडल देण्याचा निर्णय घेतला. विनेश तुझ नाव भारताच्या सुवर्ण अक्षरामध्ये कोरलं गेलं आहे, असं म्हटलं आहे.

दरम्यान, विनेश फोगाटबाबत ऑलिम्पिकमध्ये घेतलेल्या निर्णयावर देशी आणि विदेशी कुस्तीपटूंनी आपली मते मांडलीत. यामध्ये काहींनी तिच्यावर अन्याय झाल्याचं म्हटलं. तर काहींनी तिला रौप्य पदक देण्याची मागणी केली आहे. आता सुनावणीनंतर काय निर्णय येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

पोस्टाच्या ‘या’ योजनेत मिळतंय बक्कळ व्याज; महिन्याला कमवा 10 हजार रुपये

मोठी बातमी! अमोल कोल्हे आणि जयंत पाटील यांचा आपघात?, नक्की काय घडलं?

निवडणुकीपूर्वी महायुतीला धक्का बसणार? ‘या’ मित्रपक्षाने दिला वेगळा होण्याचा अल्टिमेटम

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यानच अभिषेक बच्चनची ‘ती’ पोस्ट व्हायरल; ऐश्वर्याला सोडून चक्क..

“ज्या नागांना गेली वीस वर्षे दूध पाजले, त्या नागांनी फणा काढला”