Top News मनोरंजन राजकारण

सुशांत-अंकिता का वेगळे झाले? याचीही चौकशी झाली पाहिजे- संजय राऊत

मुंबई | सुशांत सिंग आत्महत्येचा तिढा अजूनही सुटलेला नाही. सुशांतच्या आत्महत्येचा मुद्दा आता राजकारणातही महत्त्वाचा बनलाय. याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या माध्यमातून अनेक आरोप केले आहेत. यामध्ये राऊत यांनी सुशांत आणि अंकिता का वेगळे झाले याचीही तपासणी व्हायला हवी असं म्हटलंय.

सुशांतच्या आयुष्यात दोन मुली आल्या होत्या अंकिता लोखंडे आणि रिया चक्रवर्ती. अंकिताने सुशांतला सोडलं होतं. परंतु त्याच्यासोबत असलेल्या रियावर आरोप होत आहेत. अशा परिस्थितीत अंकिताने सुशांतला का सोडलं याचीही चौकशी झाली पाहिजे. ही माहिती देखील पब्लिक डोमेनमध्ये असावी, असं राऊत म्हणालेत.

सुशांतचे त्याच्या वडिलांशी संबंध चांगले नव्हते. सुशांतच्या वडिलांची दिशाभूल झाली होती, त्यामुळे त्यांनी मुंबईतील घटनेसाठी बिहारमध्ये एफआयआर दाखल केला. सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केलीये मात्र पुष्कळ लोकं कोणत्याही पुराव्याशिवाय त्याची हत्या झाल्याचं सांगतायत, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरून बिहार पोलीस आणि केंद्र सरकार मिळून महाराष्ट्र सरकारविरूद्ध कट रचत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. बिहार डीजीपी गुप्तेश्वर पांडे हे भाजपचे आहेत आणि 2009 मध्ये त्यांच्यावर अनेक आरोप लागले असल्याचंही राऊत यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

साखर कारखानदारांना कोविड हॉस्पिटल उभारायला सांगा- शरद पवार

भारतात बनणार Apple चे MacBooks आणि iPads, एवढ्या हजार लोकांना मिळू शकतो रोजगार…

बोटावर मोजण्याइतके सिनेमे, तरीही इतक्या कोटींची मालकीण आहे रिया चक्रवर्ती

पुणे जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा; ‘या’ मार्गांवर बससेवा सुरु, पण…

विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षांबाबत लवकर निर्णय होणं आवश्यक आहे- सुप्रिया सुळे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या