बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इंजिनिअर्ससाठी खुशखबर! ‘या’ मोठ्या कंपनीत होणार मेगाभरती… भरभक्कम पगारही मिळणार

नवी दिल्ली | नोकरीच्या शोधात असलेल्या इंजिनिअर्ससाठी आता सुवर्णसंधी चालत आली आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या निर्मितीत आघाडीवर असलेल्या दक्षिण कोरियाच्या सॅमसंग (Samsung) कंपनीने मेगाभरती जाहीर केली आहे. सॅमसंग कंपनी भारतातील तब्बल 1000 इंजिनिअर्सची भरती करणार असल्याची माहिती बुधवारी कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. (Recruitment in Samsung)

या एक हजार जणांमध्ये इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, डेटा मॅनेजमेंट आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. सॅमसंग इंडियाचे उपाध्यक्ष समीर वधावन यांनी संबंधीची अधिक माहिती दिली आहे. सॅमसंग कंपनी भारतातील उत्पादन वाढवण्याच्या विचारात असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचीही गरज लागणार आहे.

फक्त हजार अभियंतांनाच नाही तर येत्या काळात आणखी काही अभियंतांनाही (Engineer) संधी देणार असल्याचं वधावन यांनी सांगितलं आहे. तरूणांना जास्त संधी उपलब्ध करून देऊन त्यांच्या कल्पनांचा कंपनीसाठी उपयोग करण्याचे उद्दिष्ट सॅमसंग कंपनीने समोर ठेवले आहे. त्यामुळे येत्या काळात कुशल मनुष्यबळाची भरती होणार असल्याचंही वधावान म्हटले आहेत.

दरम्यान, पुढील वर्षी संधी देण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअर, डेटा मॅनेजमेंट, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील इंजिनिअर्सला प्रोत्साहित करण्यासाठी सॅमसंग कंपनी मोठं पॅकेज देखील देणार असल्याची माहिती सॅमसंग इंडियाचे उपाध्यक्ष समीर वधावन यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

“या सर्वांना जबाबदार कोण? मोदी सरकार पूर्ण नापास”; भाजप खासदाराचे खडे बोल

“एकेरी उल्लेख करता, तुमचं कर्तृत्व काय?”, संजय राऊतांनी घेतला पडळकरांचा समाचार

आझाद मैदानातील आंदोलनातून भाजपचा काढता पाय; सदाभाऊ म्हणाले…

“शशिकांत शिंदेंना ठरवूनच पाडलं, शिंदेंचा विजय झाला असता तर…”

“आता महिलांनी घरकोंबड्या सरकारसारखं घरातच बसायचं का?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More