नवी दिल्ली | शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या संत बाबा रामसिंग यांनी बुधवारी स्वत: ला गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती आहे.
बाबा रामसिंग हे करनालचे रहिवासी होते. त्याची एक सुसाइड नोटही समोर आली असून त्यात त्यांनी शेतकरी आंदोलनाचा संदर्भ देऊन आपल्या हक्कासाठी आवाज उठवत असल्याचं नमूद केलं आहे.
मला शेतकऱ्यांचं दुःख मला बघवत नाही आणि केंद्र सरकार काही करत नाही म्हणून आत्महत्या करीत आहे, असं सुसाइड नोटमध्ये त्यांनी लिहिलं आहे.
दरम्यान, नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ दिल्ली, हरियाणा येथील शेतकरी गेल्या तीन आठवड्यांपासून दिल्लीच्या सीमेवर निदर्शने करीत आहेत. चर्चेच्या अनेक फेर्या झाल्या पण सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये एकमत झाले नाही. शेतकरी तिन्ही कायदे रद्द करण्यावर ठाम आहेत.
थोडक्यात बातम्या-
“पायाला भिंगरी बांधल्यासारखे शरद पवार आजही काम करत आहेत”
छगन भुजबळांच्या बोलण्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही- उदयनराजे भोसले
ऑस्ट्रेलियावरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘हा’ महत्त्वाचा खेळाडू संघाबाहेर
क्रूरतेचा कळस! पिंपरी चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्याला इमारतीवरून फेकून ठार मारलं
‘बर्गरकिंग’चे शेअर्स घेतलेले गुंतवणूकदार तीनच दिवसात बक्कळ मालामाल!