नाशिक | आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठूमाऊलीच्या भेटीसाठी शिवशाही बसमधून जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं 71 हजार रुपयांचं तिकीट एसटी महामंडळानं फाडल्याची माहिती आहे. ‘लोकमत’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे.
यंदा कोरोनामुळे पायी आषाढी वारीवर शासनाने निर्बंध घातले. त्यामुळे राज्यभरातील प्रमुख सात संतांच्या पालख्या पंढरपूरला नेण्यासाठी शासनाकडून शिवशाही बस उपलब्ध करून दिली जाईल, असं सुरूवातीला सांगण्यात आलं होतं.
शासन विनामूल्य बससेवा उपलब्ध करून देणार, असा समज संस्थानच्या विश्वस्तांचा झाला होता. शासनाकडून कसलाही आदेश प्राप्त झाला नव्हता. अखेर संस्थानने तीन दिवसांच्या मुक्कामाचं 71 हजार रूपये प्रवास भाडे भरल्यानंतर मंगळवारी सकाळी महामंडळाने शिवशाही बस उपलब्ध करून दिली.
आम्ही दोन-तीन वेळा पत्र देऊन शासनानेच स्वखर्चाने शिवशाही बस उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती केलेली होती. पण दोन-तीन बैठकांमध्ये महामंडळाने त्याबाबत असमर्थता दर्शवली, असं निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष पवनकुमार भुतडा यांनी म्हटलंय.
ट्रेंडिंग बातम्या-
धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, लग्नात हजर 100 पेक्षा अधिक जणांना कोरोना
‘विठ्ठला मानवाने या संकटापुढे हात टेकले….आतातरी चमत्कार दाखव’; मुख्यमंत्र्यांची विठुरायाला साद
महत्वाच्या बातम्या-
संपूर्ण वीजबिल एकाच वेळी भरल्यास ‘इतक्या’ टक्क्यांची सूट; ऊर्जामंत्र्यांची घोषणा
कोरोनापाठोपाठ चीनमध्ये आणखी एक विषाणू आढळला
‘ओडिशापेक्षा कोकणातील वादळाची तीव्रता कमी’; दरेकरांचा अजब तर्क