बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘वाॅर्डात फिरतो तेव्हा गोरगरिबांचे हाल बघवत नाहीत’; ‘या’ आमदाराने रेमडेसिविरसाठी 90 लाखांची FD मोडली

हिंगोली | महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रसार वेगानं होतोय. त्यामुळे राज्याची स्थिती बिकट बनत चालली आहे. त्यातच औषधांचा तुटवडा हीसुद्धा गंभीर समस्या बनली आहे. रुग्णालयातील बेडसोबत रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.

रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजन मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना बरीच ओढाताण करावी लागत आहे. तसेच प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आतापर्यंत अनेकांचा जीव गेला आहे. ही गरज लक्षात घेऊन शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी  स्वत:चे फिक्स डिपॉझिट मोडून 90 लाख एका खासगी वितरकाला उपलब्ध करून दिले आहेत.

सध्याचा कोरोनाचा काळ हा अतिशय वाईट आहे. लोकांचे जीव वाचविण्यासाठी जे शक्य आहे, तेवढं करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. वाॅर्डात फिरतो तेव्हा गोरगरिबांचे हाल बघवत नाहीत. त्यामुळे इंजेक्शनसाठीची अडचण दूर करण्यासाठी मदतीचा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, सुरुवातीला 900 रुपये दराने जवळपास पाचशे रेमडेसिविर इंजेक्शन्स आणून संतोष बांगर यांनी मोफत वाटले होते. नंतर त्यांच्याकडे इंजेक्शन्स मिळतात म्हणून त्यांना अनेकांचे फोन येऊ लागले. मात्र बाजारपेठेत व इतर जिल्ह्यांतही इंजेक्शन्स मिळत नसल्याने अडचणी वाढल्या. अशातच जिल्ह्यातील इंजेक्शनचाही स्टॉक संपला. जिल्हा रुग्णालयात इंजेक्शन्स मागवायचे तर एवढी मोठी रक्कम गुंतवल्यानंतर प्रशासनाकडून ती वेळेत न मिळाल्यास व्याजाचा भुर्दंड कुणी सोसायचा म्हणून एकही वितरक इंजेक्शन्स मागवत नव्हता. हे कळताच बांगर यांनी स्वत: फिक्स डिपॉझिटमधील 90 लाखांची रक्कम खासगी वितरकाला उपलब्ध करून दिली.

थोडक्यात बातम्या- 

‘मासिक पाळीदरम्यान लस घेऊ नये’; त्या व्हायरल मेसेजवर सरकारने दिलं स्पष्टीकरण

लस घेतल्यानंतर कोरोनाचा कितपत संसर्ग होऊ शकतो?; समोर आली महत्वाची माहिती

“अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी एका नव्या मनमोहन सिंगांची देशाला गरज”

क्रिकेट विश्वावर दुखा:चा डोंगर; 33 वर्षीय अश्विन यादवचं निधन

18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस देणार का?, अजित पवार म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More