हिंगोली | शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार (MVA) पडले. त्यानंतर शिवसेनेने बंडखोर आमदार आणि मंत्र्यांवर कारवाईसत्र सुरु केेले. शिंदे गटाच्याजवळ जाणाऱ्या आमदार, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माजी आजी सर्व लोकांना शिवसेना पक्षातून नारळ दिला जात आहे. आता शिवसेनेचे मराठवाड्यातील आमदार आणि हिंगोली जिल्हाप्रमुख संतोष बांगर (Santosh Bangar) यांची शिवसेेनेने जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी केली आहे.
काही दिवसांपूर्वी आपल्या मतदार संघात संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) समर्थनार्थ मोर्चा काढला होता. त्यात त्यांनी पक्ष सोडून जाऊ नका, परत या, असे भावनिक आवाहन शिंदे गटाला केले होते. यावेळी भाषणादरम्यान ते रडले देखील होेते. आता त्यांनी शिवसेनेला राम राम ठोकला आणि शिंदे गटात सामिल झाले. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ही कारवाई केली. त्यांना जिल्हाप्रमुख पदावरुन हाकलण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर बांगर मुंबईहुन आपल्या मतदार संघात परतले होते. त्यावेळी ते ढसाढसा रडले देखील होते. परंतु बहुमत चाचणीच्या एक दिवस अगोदर ते शिंदे गटात सामिल झाले. मराठवाड्यातील शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून बांगर यांची ओळख आहे. त्यांच्या यू-टर्नमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा कोकणात जाऊन कोथळा बाहेर काढू, अशी धमकी दिल्याने बांगर चर्चेत आले होते. संतोष बांगर हे नेहमी ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ होते. परंतु शिंदे यांच्या बंडानंतर त्यांनी आपला स्वामी बदलला.
थोडक्यात बातम्या –
गोव्याच्या राजकीय वातावरणात बिघाड, सोनिया गांधींनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल
‘नामांतराविषयी आमच्याशी चर्चा झाली नाही’, शरद पवारांचा खळबळजनक खुलासा
‘आज खऱ्या अर्थाने मी तणावमुक्त झालो’ -दिलीप वळसे पाटील
बंडखोर आमदारांविरोधातील याचिकेवर आज सुनावणी नाही?, अत्यंत महत्त्वाची समोर
महाविकास आघाडी संदर्भात शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
Comments are closed.