हिंगोली | शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी विदर्भ आणि मराठवाड्यात शिवसंपर्क अभियान सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून तयारी करण्यात येत आहे. त्यातच आता हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानात वंचित बहूजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
हिंगोलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी बोलताना गेल्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांनी एक हजार कोटी घेतल्याचा आरोप केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी हेलिकॉप्टरने प्रचार सभा केल्या. भाजप मत विभाजित करतो. त्यांनी मत विभाजित करण्यासाठीचं एमआयएमला पुढे केलं होतं. गेल्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितचा त्यासाठीचं वापर झाला, असा आरोप संतोष बांगर यांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांचे हात मजबूत करायचे आहेत. प्रकाश आंबेडकर यांना बौद्ध समाजाला ताकद दाखवायची आहे. ते कोणाच्या भरोश्यावर?, असा सवाल संतोष बांगर यांनी उपस्थित केला आहे. संतोष बांगर यांनी यावेळी बोलताना खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला दिलेल्या युतीची ऑफरवरून टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, एमआयएमने महाविकास आघाडीत समाविष्ट होण्याचा प्रस्ताव दिला होता. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. वंचितसुद्धा भाजपचीचं टीम आहे, असा घणाघाती आरोप संतोष बांगर यांनी केला आहे. तसेच एमआयएमला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्याचे कारण नाही, अस संतोश बांगर म्हणाले आहेत. संतोष बांगर यांच्या आरोपांवर वंचितकडून अद्याप कोणतंही प्रत्युत्तर देण्यात आलेलं नाही.
थोडक्यात बातम्या-
“मुख्यमंत्र्यांच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही, आम्ही थांबणार नाही”
मोठी बातमी! शिवसेनेचा आणखी एक बडा नेता ईडीच्या रडारवर, कोट्यवधींची मालमत्ता जप्त
मोठी बातमी! पुतिन यांचा रशियन सैन्याला मोठा आदेश
…म्हणून महाविकास आघाडीच्या आमदाराला भर विधानसभेत रडू कोसळलं!
“यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का?”
Comments are closed.