“शिवरायांच्या पुतळ्याला एलईडी लावायला पैसे दिले तर मला माझे कपडे विकावे लागतील”

जालना | भाजपचे भोकरदन विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांचे चिरंजीव असलेले संतोष रावसाहेब दानवे (Santosh Danve) यांचा एक जूना व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यात आमदार संतोष दानवे एका शिवप्रेमीला हटकताना दिसत आहे.

पुतळ्याला एलईडी लावायला जर मी पैसे दिले तर, मला माझे कपडे विकायला लागतील, असं वादग्रस्त वक्तव्य संतोष दानवे (Santosh Danve) यांनी केलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ जूना असून आता पुन्हा व्हायरल होत आहे.

भाजप नेते सतत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. यामुळे भाजपची अडचण झाली आहे. यात प्रसाद लाड यांच्या वक्तव्याची भर पडली आहे.

शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असं वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. वक्तव्यावरुन टीका सुरु झाल्यानंतर प्रसाद लाड यांनी दिलगिरी व्यक्त केली, तसेच कालच मी माझं वक्तव्य सुधारलं होतं, असं देखील ते म्हणाले

दरम्यान, भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी हे एका हिंदी वृत्त वाहिनीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर चर्चा सुरू होती. यावेळी भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही विनायक सावरकर यांच्यासोबत केली.

सुधांशु त्रिवेदी यांच्या या डिबेटमधील शिवाजी महाराजांवरील वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं होतं. यानंतर राज्यातील वातावरण तापलं होतं. विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-