Santosh Deshmukh Case | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली असून या प्रकरणी एक सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. या SIT मधून तीन अधिकाऱ्यांना काढण्यात आलंय. या अधिकाऱ्यांचा वाल्मिक कराडसोबत फोटो असल्याने त्यांना बाहेर कढण्यात आलंय. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राज्य सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथकमधून काही अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. (Santosh Deshmukh Case)
SIT मधील एपीआय महेश विघ्ने यांचा वाल्मिक कराड सोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमुळे विरोधी पक्षाने आक्षेप घेतला होता. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तपास निष्पक्षपणे होणार नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.
यामुळे आता एपीआय महेश विघ्ने, हवलादार मनोज वाघ आणि एका उपनिरीक्षकाला SIT मधून हटवण्यात आलं आहे. बीडची स्थानिक गुन्हे शाखा या हत्या प्रकरणाचा तपास करत आहे.त्यानीच 5 आरोपींना अटक केली आहे. तर, कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे. त्याला आज रात्रीपर्यंत पकडण्यात येईल, असा दावा केला जातोय.
जितेंद्र आव्हाड यांनी काय ट्वीट केलं होतं?
संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या SIT मधे एक प्रमुख IPS बाहेरील नेमला आहे. त्यांच्याखाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहेत. यातील एक PSI महेश विघ्ने पहा. धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे. किती जवळचे अन प्रेमाचे संबध आहेत पहा हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील? याच विघ्ने याने निवडणूक काळात धंनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असल्या प्रमाणे काम केलेले आहे. दुसरा मनोज कुमार वाघ हा वाल्मीक कराड चा आत्यंत खास माणुस असून गेले 10 वर्षे तो बीड LCB मध्येच आहे आणि वाल्मिकसाठी काम करतोय, असं ट्वीट आव्हाड यांनी केलं होतं. (Santosh Deshmukh Case)
संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या SIT मधे एक प्रमुख IPS बाहेरील नेमला आहे. त्यांच्याखाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहेत. यातील एक PSI महेश विघ्ने पहा. धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे. किती जवळचे अन प्रेमाचे संबध आहेत पहा हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील… pic.twitter.com/5BThMPUvng
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 5, 2025
SIT मधून ‘या’ अधिकाऱ्यांना काढलं
दरम्यान, सरपंच हत्या प्रकरण आणि खंडणी व मारहाण प्रकरणाचा तपास करण्यासाठी उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटी नियुक्त केली आहे. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक विजयसिंह झोनवाल, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, सहायक फौजदार तुळशीराम जगताप, हवालदार मनोज वाघ यांचा समावेश होता.
मात्र, विघ्नेसह काही कर्मचाऱ्यांचे सरपंच हत्येतील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले. विरोधकांनीही हा मुद्दा उचलून धरला. अखेर एपीआय महेश विघ्ने, हवालदार मनोज वाघ आणि एका उपनिरीक्षकाला एसआयटीमधून काढण्यात आलंय. (Santosh Deshmukh Case)
News Title : Santosh Deshmukh Case API mahesh vighne & manoj wagh remove from sit
महत्त्वाच्या बातम्या-
नववर्षात गुड न्यूज, लाडक्या बहीणींनो 2100 रुपये ‘या’ दिवशी मिळणार?
17 मोबाईल नंबर, 100 बँक खाती अन्..; वाल्मिक कराडबाबत सुरेश धसांचा मोठा खुलासा
ब्रेकिंग! प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक प्रशांत किशोर यांना अटक
‘खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक?’; सुरेश धसांच्या आरोपांनी खळबळ
टीम इंडियाला धक्का, ‘या’ दिग्गज खेळाडूने तडकाफडकी घेतली निवृत्ती