“प्लांट बंद करायला पाठवलं होतं, पण हात हलवत परत..”;चाटे-सुदर्शन घुलेचा संपूर्ण संवाद CID च्या हाती

Santosh Deshmukh Case CID Uncovers Crucial Evidence

Santosh Deshmukh Case | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी मोठे धक्कादायक खुलासे होत आहेत. सीआयडीच्या तपासानुसार, या हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड (Walmik Karad) असल्याचे उघड झाले आहे. तसेच, या प्रकरणात पाच गोपनीय साक्षीदारांचे जबाब महत्त्वाचे ठरत आहेत. तिरंगा हॉटेलमध्ये जेवणावेळी हत्येचा कट रचल्याचे स्पष्ट झाले असून, या कटात विष्णू चाटे (Vishnu Chate) आणि सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) यांचाही सहभाग असल्याचे पुरावे सीआयडीच्या हाती लागले आहेत. (Santosh Deshmukh Case)

6 डिसेंबर 2024 चा व्हिडीओ आणि हत्येचा कट

6  डिसेंबर 2024 रोजी मस्साजोगमध्ये झालेल्या भांडणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये सुदर्शन घुले दिसत होता. यानंतर 8 डिसेंबरला घुले आणि त्याचा एक साथीदार टाकळी येथे भेटले. यावेळी घुलेने विष्णू चाटे याचा फोन आल्याचे सांगितले आणि तिरंगा हॉटेलमध्ये जेवायला बोलावल्याची माहिती दिली. हॉटेलमध्ये चाटे आधीच हजर होता आणि तिथेच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचला गेला असल्याची माहिती समोर आली आहे. काही मीडिया रिपोर्टमध्ये याबाबत दावा करण्यात आला आहे.

गोपनीय साक्षीदारांचे जबाब समोर 

तपासादरम्यान, पाच गोपनीय साक्षीदारांनी दिलेले जबाब समोर आले आहेत.

1.  पहिला साक्षीदार: तिरंगा हॉटेलमध्ये विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात झालेले संभाषण समोर आले आहे. त्यानुसार, चाटे म्हणाला, “तुला प्लँट बंद करायला सांगितले होते, पण तू तसे केले नाहीस. आता वाल्मिक अण्णांचा आदेश आहे, संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा.”

2.  दुसरा साक्षीदार: 6  डिसेंबर रोजी झालेल्या मारहाणीनंतर संतोष देशमुख यांना फोन करून गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिला होता.

3. तिसरा साक्षीदार: वाल्मिक कराडने जिल्ह्यात दहशत माजवण्यासाठी टोळ्या तयार केल्या असून, तो खंडणी वसूल करण्यासाठी अनेक कंपन्यांना धमकावत असल्याचे उघड झाले. (Santosh Deshmukh Case)

4. चौथा साक्षीदार: बापू आंधळे हत्या प्रकरणात विनाकारण अडकवण्यात आले होते, त्यामुळे 90दिवस कारागृहात राहावे लागले. वाल्मीक कराड याची संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड दहशत असून. त्याच्या सांगण्यावरून पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल केले जातात

5. पाचवा साक्षीदार: प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे हे सुदर्शन घुलेसोबत मिळून खंडणी गोळा करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, चाटे आणि घुले यांच्यात झालेल्या संवादाचा प्रत्येक ‘शब्द’ आता सीआयडीने घेतलेल्या एका व्यक्तीच्या जबाबात आला आहे. यामुळे वाल्मिक कराड हा हत्येत आरोपी आहेच मात्र तो या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचेही उघड झाले आहे.

Title : Santosh Deshmukh Case CID Uncovers Crucial Evidence

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .