मोठी बातमी! सरपंच हत्ये प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का, मात्र वाल्मिक कराडवर…

Santosh Deshmukh Case MCOCA on all accused

Santosh Deshmukh Case | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सीआयडी आणि एसआयटीकडून तपास सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. सरपंच हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे आणि जयराम चाटे यांच्यावर आता मोक्का कायद्यांतर्गत खटला चालणार आहे. (Santosh Deshmukh Case)

एसआयटीने हा मोक्का लावला आहे. मात्र, वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आलेला नाही. वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. त्याच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा गुन्हा दाखल नाहीये, त्यामुळे कराडवर मोक्का लावण्यात आला नाही.

वाल्मिक कराडवर मोक्का लागलेला नाही, कारण…

वाल्मिक कराड हाच सरपंच हत्येमागील मास्टरमाईंड असून त्याच्यावर तसा गुन्हा दाखल करून मोक्का लावण्यात यावा, अशी मागणी केली जात होती. मात्र, कराडवर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल असल्याने त्याच्यावर मोक्का लागलेला नाही. तर, इतर सर्व आरोपींवर आता मोक्का कायद्यांतर्गत खटला चालवला जाईल, याबाबत काही मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलाय. (Santosh Deshmukh Case)

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची प्रशासनाची तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच यातील आरोपींवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत कारवाई करणार असल्याचे सांगितले होते.

मोक्का कुणावर लागतो?

संघटित स्वरुपाची गुन्हेगारी असेल तर मोक्का लागतो. फक्त एका व्यक्तीवर मोक्का लागत नाही तर गुन्ह्यात दोन किंवा त्यापेक्षा अधिक म्हणजेच टोळी असेल तर मोक्का लागतो. अपहरण, खंडणी, हत्या, अमली पदार्थांची तस्करी तसेच इतर गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का लावला जातो. (Santosh Deshmukh Case)

News Title :  Santosh Deshmukh Case MCOCA on all accused

महत्वाच्या बातम्या –

तारक मेहताच्या सोढीची प्रकृती चिंताजनक, अन्नपाणीही सोडलं

जबरदस्ती घर नावावर केलं, रिव्हॉलव्हरचा धाक दाखवून…; वाल्मिक कराडच्या मुलावर गंभीर आरोप

महाविकास आघाडीत फुट? संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

मोठी बातमी! वाल्मिक कराडचा मुलगाही अडचणीत, बंदुकीचा धाक दाखवून…

देशभर जाळं असलेल्या ‘या’ मल्टीस्टेटवर ED ची कारवाई

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .