Santosh Deshmukh Case | बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात या प्रकरणी मोठी घोषणा केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली. दरम्यान, यानंतर देशमुख प्रकरणातील एक मोठी अपडेट समोर आली आहे.
कारवाईला वेग –
देशमुख हत्ये प्रकरणानंतर (Santosh Deshmukh Case) राज्याच्या राजकारणात देखील वातावरण चांगलंच पेटलं आहे. शरद पवार यांनी काल (21 डिसेंबर) रोजी देशमुख कुटुंबीयाची बीड येथील मस्साजोग गावात जाऊन भेट घेतली. एवढंच नाही तर, अधिवेशनात देखील राज्याचे मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिलेत. फडणवीस यांनी केलेल्या घोषणेनंतर, या प्रकरणातील कारवाईला वेग आला.
शनिवारी बीडच्या पोलीस अधीक्षकपदी नवनीत कांवत यांची नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर आता सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, हे हत्या प्रकरण (Santosh Deshmukh Case) योग्य प्रकारे हाताळण्यासाठी राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात आली आहे. या शिवाय, विशेष सरकारी वकील म्हणून सरकारने बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सद्यस्थितीत कोल्हे हे वकील म्हणून काम पाहणार आहेत.
सुरेश धसांची मोठी मागणी
दरम्यान, या संपूर्ण तपासासाठी ज्येष्ठ वकिल उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी, अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे. त्यामुळे आता यावर सरकार काय निर्णय घेणार आणि या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नेमणूक होणार का? हे पहावं लागणार आहे.
अधिवेशनात बोलत असताना फडणवीस यांनी म्हटलं आहे की, वाल्मिक कराड याचा संबंध कुणासोबत आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल. या प्रकरणातील सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा(Mocca) लावण्यात येणार असल्याचं देखील फडणवीस यांनी सांगितलं. तर, मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील यावर महत्वाची प्रतिक्रिया दिली. या घटनेमध्ये ज्यांनी कोणी अश्या पद्धतीने हत्या केली, त्यांना सर्वांना फाशी झाली पाहिजे. ही माझी भूमिका असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय.
News Title : Santosh Deshmukh Case new update
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ प्रसिद्ध आर्ट डायरेक्टरनं उचललं टोकाचं पाऊल?, सिनेसृष्टित एकच खळबळ!
अखेर मंत्रिमंडाळाचं खाते वाटप जाहीर, इथे वाचा संपूर्ण यादी
एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला लगावला!
खातेवाटपाआधीच मंत्री अडचणीत; फडणवीसांच्या वक्तव्याने धनंजय मुंडेंचं टेंशन वाढलं
अजितदादा…धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाका; कोणी केली मागणी?