Santosh Deshmukh Case l सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने सर्वत्र तणावाचे वातावरण आहे. मात्र या प्रकरणाचा तपास आणखी वेगाने होणार आहे. कारण सध्या या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून होत आहे. अशातच आता या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष चौकशी पथकाकडून (SIT) स्थापन करण्यात येणार आहे. यासंदर्भात आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्त्वात एसआयटी स्थापनेची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आजपासून SIT पथक चौकशीला सुरवात करणार आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग येणार? :
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन केलेली एसआयटी आज बीड जिल्ह्यात दाखल होणार आहे .यावेळी आयपीएस बसवराज तेली यांच्या नेतृत्वात तब्बल 10 जणांची टीम या प्रकरणाचा तपास करणार आहे. मात्र आता एसआयटीच्या स्थापनेनंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला अधिक वेग मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला तब्बल 23 दिवस झाले आहेत. मात्र, अद्यापही या प्रकरणातील तीन आरोपी फरार आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी एसआयटी स्थापनेची गृह विभागाने अधिकृत आदेश काढले आहेत.
Santosh Deshmukh Case l एसआयटीमध्ये ‘या’ अधिकाऱ्यांचा समावेश? :
१) आयपीएस अधिकारी डॉ. बसवराज तेली – पोलीस उपमहानिरीक्षक
२) अनिल गुजर – पो. उप अधीक्षक
३) विजयसिंग शिवलाल जोनवाल- स.पो. निरीक्षक
४) महेश विघ्ने – पो.उ.निरीक्षक
५) आनंद शंकर शिंदे- पो.उ.निरीक्षक
६) तुळशीराम जगताप – सहा. पो. उ. निरीक्षक
७) मनोज राजेंद्र वाघ – पोलीस हवालदार
८) चंद्रकांत एस.काळकुटे – पोलीस नाईक
९) बाळासाहेब देविदास अहंकारे – पोलीस नाईक
१०) संतोष भगवानराव गित्ते – पोलीस शिपाई
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. मात्र आता या तिन्ही आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकरणातील सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तीन आरोपी फरार आहेत. तसेच हे तिन्ही आरोपी वाल्मिक कराडसाठी काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.
News Title : Santosh Deshmukh Case SIT will investigate
महत्त्वाच्या बातम्या-
बीड पोलीस ठाण्यात आणले 5 पलंग, रोहित पवारांनी कराड कनेक्शन असल्याचा केला आरोप!
‘हळूहळू टीव्ही, एसी असं सगळंच…’; वाल्मिक कराडला तुरुंगात मिळतेय VIP ट्रीटमेंट?
मोठ्या आकाला वाचवण्यासाठी कराडचं एन्काऊंटर होणार?, अत्यंत खळबळजनक दावा समोर
“हैदराबादला अल्लू अर्जुनला अटक होते पण महाराष्ट्रात…”; ‘या’ नेत्याचा हल्लाबोल
नवीन वर्षात सोनं स्वस्त झालं की महाग?, काय आहेत सध्या ग्रॅमचे दर?