Santosh Deshmukh Case | बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड देखील आता पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र, 3 आरोपी अजूनही फरार आहेत. अशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्याप्रमाणे आज विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटी गठित करण्यात आली आहे. यामुळे तपासाला आणखी वेग येणार आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर निर्णय लागावा, यासाठी राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय. (Santosh Deshmukh Case )
या एसआयटी समितीमध्ये 10 जणांचा समावेश असून पुणे सीआयडीचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्याकडे या एसआयटी समितीचे नेतृत्त्व देण्यात आले आहे. याचबरोबर इतरही अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.
एसआयटी पथकात कुणाचा समावेश?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी पथकात सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विजयसिंग जोनवाल, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, केजचे पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस उपमहानिरीक्षक तुळशीराम जगताप, पोलीस हवालदार मनोज वाघ, केज पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक चंद्रकांत काळकुट्टे, पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे व पोलीस शिपाई संतोष गीते यांचा समावेश आहे.
देशमुख यांच्या हत्येला आता महिना होत आला आहे.मात्र, अजूनही सर्व आरोपी ताब्यात घेण्यात आले नाहीत. या प्रकरणात आतापर्यंत जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे यांना अटक करण्यात आली आहे. तर, मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे फरार आहेत. तरसध्या वाल्मिक कराड हा कोठडीत असून त्याची चौकशी सुरू आहे. (Santosh Deshmukh Case )
वाल्मिक कराडची कसून चौकशी सुरू
वाल्मिक कराडला 15 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.त्याला बीड शहर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी सध्या वाल्मिक कराड याची कसून चौकशी करत आहेत.सध्या कराड याच्यावर फक्त पवनचक्की निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल आहे. मात्र, देशमुख कुटुंब तसेच विरोधी पक्षाने कराडवर संतोष देशमुख हत्याप्रकरणात सहभाग असल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.
देशमुख यांची हत्या झाली तेव्हापासून कराड हा फरार होता. अखेर 31 डिसेंबररोजी दुपारून तो स्वतः पोलिसांना शरण आला.वाल्मिक कराड याने 22 दिवसांनी स्वत:हून शरणागती पत्कारली. यामुळे पोलीस आणि सीआयडीच्या कार्यक्षमतेबद्दल आता प्रश्न केले जात आहेत. (Santosh Deshmukh Case )
News Title : Santosh Deshmukh Case SIT will investigate
महत्त्वाच्या बातम्या-
श्री स्वामींच्या कृपेने आज ‘या’ राशींची सगळी कामे सुरळीत पार पडतील!
धक्कादायक! ‘तो’ प्रयोग होऊ नये म्हणून कराडने केलं आजारपणाचं सोंग?
“सीआयडीला जमत नसेल तर शिवाजी साटम यांच्याकडे तपास द्या”
झटपट वजन कमी करण्यासाठी ‘ही’ गोष्ट ठरते फायदेशीर!
‘या’ कारणांमुळे वाल्मिक कराडला 15 दिवसाची कोठडी!, सरकारी वकिलांकडून गौप्यस्फोट