Santosh Deshmukh Case | बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. या प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी CID व SIT पथक नेमक्यात आलं आहे. पोलिसांनी या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींना राज्यातील विविध भागातून ताब्यात घेतलंय. वाल्मिक कराडसह खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे दोघेही सध्या अटकेत आहेत. त्यांची कसून चौकशी केली जातेय. (Santosh Deshmukh Case)
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मास्टरमाईंड असून त्याच्यावर असा गुन्हा दाखल करा, अशी मागणी सातत्याने केली जातेय. कराडविरोधात प्रचंड रोष नागरिक तसेच विरोधकांकडून व्यक्त केला जातोय. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी देखील केली जातेय.संतोष देशमुख यांची हत्या आणि पवनचक्की खंडणी प्रकरणातील सर्वच गुन्हेगार अट्टल असून त्यांच्या गुन्ह्यांची यादीच आता समोर आली आहे.
वाल्मिकसह सुदर्शन घुले व सांगळेचे गुन्हे समोर
मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा तर वाल्मिक कराडच्याही पुढचा असल्याचं समोर आलंय. मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होत असलेला खंडणीखोर वाल्मिक कराड याच्यावर तब्बल 19 गुन्ह्यांची नोंद आहे. तर सुदर्शन घुलेवरही 19 गुन्हे दाखल आहेत. फरार आरोपी कृष्णा आंधळेवर सहा गुन्ह्यांची नोंद आहे. महेश केदारवर देखील सहा गुन्ह्यांची नोंद आहे. (Santosh Deshmukh Case)
यातील आणखी एक आरोपी असलेल्या प्रतीक घुलेवर पाच गुन्ह्यांची नोंद , जयरामम चाटेवर तीन गुन्ह्यांची नोंद तर विष्णू चाटे आणि सुधीर सांगळेवर दोन गुन्ह्यांची नोंद आहे. असे गंभीर गुन्हे असलेल्या या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई होणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आतापर्यंत संतोष देशमुख हत्या प्रकरणात या सर्वांना अटक करण्यात आली असून कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे.
कराडला दोन शासकीय बॉडीगार्ड कसे मिळाले?
तसेच हत्येदिवशी लोकेशन देणाऱ्या सिद्धार्थ सोनवणेला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे या तिघांना फरार होण्यामध्ये धारूर जिल्ह्यातील डॉक्टर आणि ऊसतोड मजुरांचा मुकादम संभाजी वायबसे आणि त्याच्या वकील बायकोने मदत केली होती. त्यांनाही ताब्यात घेण्यात आले होते.
खंडणीखोर वाल्मिक कराडवर तर हाफ मर्डरचा देखील गुन्हा दाखल आहे. त्याने दोन शासकीय बॉडीगार्ड देखील ठेवले होते. यासाठी त्याने तीन महिन्यांसाठी 9 लाख 72 हजार रुपये मोजले होते. इतका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला दोन दोन पोलिस कसे मिळाले?, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. (Santosh Deshmukh Case)
News Title : Santosh Deshmukh Case Walmik Karad Sudarshan Ghule crimes
महत्त्वाच्या बातम्या-
सरपंच हत्येप्रकरणी सर्वात मोठी अपडेट, SIT मधून ‘त्या’ अधिकाऱ्यांना हटवलं
HMPV व्हायरसमुळे महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर; जाणून घ्या लक्षणं
नववर्षात गुड न्यूज, लाडक्या बहीणींनो 2100 रुपये ‘या’ दिवशी मिळणार?
17 मोबाईल नंबर, 100 बँक खाती अन्..; वाल्मिक कराडबाबत सुरेश धसांचा मोठा खुलासा
ब्रेकिंग! प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक प्रशांत किशोर यांना अटक