संतोष देशमुख हत्येच्या व्हायरल फोटोंमुळे वातावरण तापलं, आज बीड जिल्हा बंद

Santosh Deshmukh Murder Beed District Shutdown Amid Outrage

Santosh Deshmukh Murder | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. घटनेला तीन महिने पूर्ण झाले, तरी अजूनही एक आरोपी फरार असल्याने संताप व्यक्त केला जातोय. त्यातच हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली असून या घटनेच्या निषेधार्थ आज, मंगळवार 4 मार्च रोजी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. (Santosh Deshmukh Murder )

फोटो आणि व्हिडीओ व्हायरल, राज्यभर संताप

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठे खुलासे झाले असून, CIDने दाखल केलेल्या आरोपपत्रातून हत्येचे भयानक तपशील समोर आले आहेत. त्यानंतर हत्येचे काही फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. या हत्येचे काही फोटो आणि व्हिडीओ काल रात्री उघड झाले, ज्यात आरोपींनी अमानुष मारहाण करत त्यांचा जीव घेतल्याचे स्पष्ट दिसते.

या हत्येच्या कटात सहभागी असलेले विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे आणि कृष्णा आंधळे यांची नावे आरोपपत्रात आहेत. विशेष म्हणजे, अटक आरोपींपैकी एकाच्या स्मार्टफोनमध्ये ही अमानुष हत्या कशी करण्यात आली याचे फोटो आणि व्हिडीओ सापडले. या दृश्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

बीड जिल्हा बंद, आरोपींना फाशीची मागणी

या क्रूर घटनेच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात आज संपूर्ण बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फाशीची कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिक आणि ग्रामस्थ करत आहेत.   (Santosh Deshmukh Murder )

दरम्यान, CID ने दाखल केलेल्या 1800 पानी आरोपपत्रात 66 महत्त्वाचे पुरावे आणि काही जबाब नोंदवले आहेत. सध्या न्यायालयात हे प्रकरण सुरू असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. सोशल मीडियावर देखील संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली जात आहे. या प्रकरणावरून सरकारला आणि कायदा-सुव्यवस्थेला सवाल करण्यात येत आहेत.

Title : Santosh Deshmukh Murder Beed District Shutdown Amid Outrage

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .