Santosh Deshmukh murder case | सरपंच संतोष देशमुख हत्या आणि आवादा (Awada) खंडणी प्रकरणाच्या (Extortion Case) तपासाला वेग आला आहे. या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामध्ये सुदर्शन घुले (Sudarshan Ghule), सुधीर सांगळे (Sudhir Sangle), प्रतीक घुले (Pratik Ghule), महेश केदार (Mahesh Kedar), जयराम चाटे (Jayaram Chate), सिद्धार्थ सोनवणे (Siddharth Sonawane) या आरोपींचा समावेश आहे. न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे आरोपींना जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. (Santosh Deshmukh murder case)
आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना आज (शनिवारी) न्यायालयात (Court) हजर करण्यात आले होते. आरोपींना पुन्हा तपासासाठी पोलीस कोठडी (Police Custody – PCR) देण्याच्या अटीवर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली आहे. कुठलाही तपासाचा नवीन मुद्दा उपस्थित झाला नाही.
सरकारी पक्षाच्या (Government Side) वतीने न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली आणि न्यायालयाने ती मान्य केली, अशी माहिती सरकारी वकील (Public Prosecutor) बाळासाहेब कोल्हे (Balasaheb Kolhe) यांनी दिली.
दरम्यान, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या दोघांच्या जामीन अर्जावर २० जानेवारी (सोमवार) रोजी पुढील सुनावणी होणार आहे. आरोपींच्या वकिलाने पुढील तारीख मागितल्याने न्यायालयाने वाढीव तारीख दिली. खंडणी प्रकरणात कराड व चाटे या दोघांनी जामिनासाठी अर्ज केला होता. (Santosh Deshmukh murder case)
सरकारी वकिलांची प्रतिक्रिया
“आधीच ४५ दिवस तपास केला आहे आणि नियमानुसार, आज पीसीआर देता आला नसता म्हणून सरकारी पक्षाने एमसीआरची (Magisterial Custody Remand – MCR) मागणी केली. त्यामुळे न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सरकारी पक्षाने पुन्हा पीसीआर मागितली तर आम्ही त्याला विरोध करू,” अशी प्रतिक्रिया आरोपींचे वकील अनंत तिडके (Anant Tidke) यांनी दिली.
“आरोपींना एकत्र ठेवणार की वेगवेगळे हा जेल प्रशासनाचा (Jail Administration) अधिकार आहे. मला आरोपींशी स्वतंत्र बोलण्याची संधी न्यायालयाने दिली,” असेही तिडके म्हणाले. (Santosh Deshmukh murder case)
Title : Santosh Deshmukh murder case Accused remanded to 14 day judicial custody