Santosh Deshmukh Murder Case | बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले (Sudharshan Ghule) याच्यासह सुधीर सांगळेला (Sudhir Sangle) पुण्यातून आज अटक करण्यात आली. इतके दिवस हे आरोपी फरार होते. मात्र, अजूनही एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. कृष्णा आंधळे हा एक आरोपी फरार आहे. त्याच्या शोधासाठी आता विशेष पथक मागावर असल्याचं बोललं जातंय.
देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या डॉक्टर संभाजी वायबसे यांना पोलिसांनी याआधीच अटक केली होती. तसेच डॉ. संभाजी वायबसे, त्याची पत्नी आणि आणखी एकाला ताब्यात घेण्यात आलं होतं. एसआयटीकडून तिघांची कसून चौकशी केली गेली.
डॉ. संभाजी वायबसे आहे तरी कोण?
या डॉक्टरने चौकशीत दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) आणि सुधीर सांगळे यांचा शोध घेत त्यांना अटक केल्याची माहिती आहे. या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी टेक्निकल टीम तयार करून आरोपींच्या मोबाईलचे लोकेशन आणि ज्या लोकांच्या संपर्कात होते त्यांच्या चौकशीनंतर काही माहिती मिळवली. त्या आधारे या दोघांना अटक करण्यात आली आहे.(Santosh Deshmukh Murder Case)
या हत्या प्रकरणामध्ये डॉक्टर वायबसे यांना का अटक करण्यात आली, त्यांचा याच्याशी काय संबंध आहे? याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. काही वर्षांपूर्वी संभाजी वायभसे हा स्वतः बीडमध्ये एक रुग्णालय चालवायचा. मात्र तो नंतर ऊसतोड मुकादम म्हणून काम करायचा. सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळे याच्यासोबत तो काम करायचा अशी माहिती आहे. ऊसतोड मुकादम असे काम करत असताना त्या तिघांसोबत डॉक्टरचा संबंध आला.
सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला अटक
संभाजी वायभसे सध्या डॉक्टरकीचा व्यवसाय करत नाही. त्याची पत्नी वकील असून त्यांनी काही दिवस सरकारी वकील म्हणूनही काम केलेलं आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवसापासून हे दोघे पती-पत्नी फरार होते. सुदर्शन घुले सह संभाजी वायबसे देखील राज्याबाहेर गेले असल्याची माहिती होती. या डॉक्टरने राज्याबाहेर जाऊन सुदर्शन घुले याला मदत केली होती. जेव्हा या डॉक्टरला अटक झाली त्यानंतर आरोपी सुदर्शन घुले याचा देखील तपास लागला.
दरम्यान, आतापर्यंत या प्रकरणात जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे यांना अटक करण्यात आली आहे. तर, मुख्य आरोपी सुदर्शन घुले(Sudarshan Ghule), कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे इतके दिवस फरार होते. मात्र, आता या तीन फरार आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. काही मीडिया रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आलाय. तसेच यातील कथित मास्टरमाईंड वाल्मिक कराड देखील सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. (Santosh Deshmukh Murder Case)
News Title – Santosh Deshmukh Murder Case big update
महत्त्वाच्या बातम्या-
संतोष देशमुख हत्या प्रकरणात डॉक्टरला अटक, त्याचा नेमका रोल काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरण…; अखेर सुदर्शन घुलेच्या मुसक्या आवळल्या?
‘त्या’ लाडक्या बहीणींचे पैसे पुन्हा सरकारजमा; कारण…
विष्णू चाटेनं अखेर तोंड उघडलं, वाल्मिक कराडबाबत दिली अत्यंत धक्कादायक कबुली
संतोष देशमुख हत्याप्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर!